मालेगाव : नाशिक मिरर वेबटीम

मालेगाव तालुक्यातील मुंगसे गावामधील तलावात बुडून दोघा मित्रांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना रविवारी दुपारी घडली. राहूल राजेंद्र सागर (वय 19) व प्रसाद खंडेराव सूर्यवंशी (वय 19) असे मृतांची नावे आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, मुंगसे – टाकळी रोडवर गाव तलाव आहे. या परिसरात भटकंती करण्यासाठी राहुल व प्रशांत हे मित्र गेले होते. त्यांनी मोबाईलमध्ये अनेक फोटो टिपले. तेच अखेरचे ठरतील, याची पुसटशीही कल्पना कुणाला नव्हती. एकाला पाण्यात उतरण्याचा मोह झाला. परंतु पोहता येत नसल्याने तो बुडू लागला. दुसऱ्याने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, खोल पाण्यात खेचले जाऊन दोघे युवक तलावात बुडाले. ग्रामस्थांनी दोघांना बाहेर काढले. मालेगाव सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.. सायंकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

बातम्या

Don`t copy text!