आज उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये १३७ ने घट

सद्यस्थितीत ३ हजार ९९५ रुग्णांवर उपचार सुरू

नाशिक मिरर वेबटीम :
जिल्हा शासकीय सामान्य रुग्णालयामार्फत आज दि.१ नोव्हेंबर रोजी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ८८ हजार ०६ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर सद्यस्थितीत ३ हजार ९९५ रुग्णांवर उपचार सुरु असलेल्या रुग्णामध्ये १३७ ने घट झाली आहे. आत्तापर्यंत १ हजार ६७० रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण :

नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक १४३, चांदवड २८, सिन्नर २९४,दिंडोरी १२६, निफाड ३००, देवळा २५, नांदगांव ९२, येवला ३६, त्र्यंबकेश्वर २२, सुरगाणा ०४, पेठ ००, कळवण २३, बागलाण ४३, इगतपुरी ४३, मालेगांव ग्रामीण ६६
असे एकूण १ हजार २४५ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात २ हजार ६१२, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात १२२ तर जिल्ह्याबाहेरील १६ असे एकूण ३ हजार ९९५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात ९३ हजार ६७१ रुग्ण आढळून आले आहेत.

रुग्ण बरे होण्याची टक्केवारी :

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे ९३.१३, टक्के, नाशिक शहरात ९४.३९ टक्के, मालेगाव मध्ये ९३.०६ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९२.४६ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९३.९५ इतके आहे.

एकूण मृत्यु :    नाशिक ग्रामीण ५९९, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून ८६७, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून १६६ व जिल्हा बाहेरील ३८ अशा एकूण १ हजार ६७० रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

लक्षणीय :

◼️९३ हजार ६७१ कोरोनाबाधित रुग्णांपैकी ८८ हजार ०६ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज.

◼️सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले ३ हजार ९९५ पॉझिटिव्ह रुग्ण.

◼️जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण
९३.९५ टक्के.

(वरील आकडेवारी ही दि १ नोव्हेंबर २०२० रोजी १२ वाजेपर्यंत ची जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे)

बातम्या

Don`t copy text!