आशिष नहार यांची राष्ट्रीय सचिवपदी निवड

नाशिक मिरर वेब टीम :
इंडियन आईस्क्रीम मँन्यूफॅक्चरर्स असोसिएशन च्या झालेल्या कार्यकारिणी बैठकीत राष्ट्रीय अध्यक्षपदी स्कुप्स आईस्क्रीम हैदराबादचे सुधीर शहा यांची , तर राष्ट्रीय सचिव पदी फन इंडिया डेअरीचे आशिष नहार यांची बिनविरोध निवड करण्यात आली .नहार यांच्या निवडीने महाराष्ट्राला प्रथमच या शिखर संस्थेवर प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळाला आहे . दरम्यान हे असोसिएशन आईस्क्रीम उत्पादन व त्यासाठी लागणारा कच्चा माल व मशनरी उत्पादन करणाऱ्या उद्योगाचे प्रतिनिधित्व करते.नहार यांनी मागील वर्षी राष्ट्रीय कार्यकारणीचे वार्षिक सभा नाशिक येथे आयोजित केली होती. भारतीय आईस्क्रीम उद्योगांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ खुली करून जास्तीत जास्त निर्यात देशातून व्हावी यासाठी प्रयत्नशील असल्याचे आशिष नहार यांनी यावेळी सांगितले.

बातम्या

Don`t copy text!