एकनिष्ठतेचे मूर्तिमंत उदाहरण रायते परिवार

नाशिक मिरर वेबटीम : शंकरराव रायते या नावाचा नाव लौकीक असलेल्या सातपुर पंचक्रोशीत रायते परीवाराला राजकीय व सामाजिक स्पर्श झाला अशा व्यक्तिचा गुण हेरून रायते कुंटुबियात आजी छबुबाई रायते, काका भगवान शेठ रायते,जगदिशशेठ रायते,आणी बाळासाहेब रायते, कै. भास्कर रायते, व  बहीण पदमा ढिकले अशा भावंडाचा राजकीय व सामाजिक प्रवास  सुरु झाला, वडील 1983 पासून जुने शिवसैनिक व सातपूर विभागातील सर्वप्रथम शाखा प्रमुख ते सातपूर विभागप्रमुख असा प्रवास करत असताना 1992 साली नाशिक महानगरपालिका उदयास आली,   आणि 1992 साली जगदीश आप्पाना शिवसेनेची अधिकृत उमेदवारी मिळाली आणि थोड्या मताने त्यांना पराभव स्वीकारावा लागला. राजकीय व सामाजिक काम करत असताना रायते परिवार सहकार क्षेत्रात ही कमी नाही पडले, त्यांच्या काकू सौ मुक्ता भगवान रायते नाशिक जिल्हा महिला सहकारी बँकेच्या 5 वर्ष संचालक व व्हा चेअरमन पदावर, व बाळासाहेब रायते हे नाशिक मर्चंटच्या बँकेवर मुख्य शाखा सल्लागार देखील काम केल्याचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे, तसेच लहाण्या काकू सौ सुवर्णा बाळासाहेब रायते  व आई सौ नंदा जगदीश रायते या देखील किराणा व्यवसायात अग्रेसर आहे, तसा दांडगाच परंतु सर्व कांकाच्या व वडिलांच्या अनुभवातुन एक पाउल पुढे टाकत रायते परीवारात जन्मलेल्या मा.जगदिश अप्पा रायते व सौ नंदा जगदीश रायते यांचे जेष्ठ सुपुत्र श्री.जिवन रायते यांनी परीवाराला साभांळुन वडिलांच्या खांद्याला खांदा लावुन घराला हातभार लावुन आपले राजकीय व सामाजिक जिवन घडवित गेले.काहि वर्षा पुर्वी घरची परीस्थिती जेमतेम हहोती परंतु मनी चिकाटी व प्रगतीचा ध्यास होता त्यामुळे जिवन भाऊंना जिवन जगणे जिकरीचे नव्हते परंतु कुटुंबाचा भार उचलत  भावंडाच्या शिक्षणात व प्रगतीत जिवन भाऊंचा हातभार लाख मोलाचा आणी त्यातच पतसंस्था,ए,बी,बी कंपनी ते टापारीया टुल्स असा प्रवास करीत असतांना आपन एक नोकरदार व्यक्ती असल्याची जाणीव फार मोठी टापारीया कंपनीत चांगल्या पदावर काम करत असतांना भाऊंचे लग्न सिन्नर च्या नातेवाइकांच्याच परीवातील मुलीशी झाले.त्यामुळे समाजात वावरतांनाही नातेवाइकांची नाळ वाढतच गेली.आपण घरात कमी वेळ देत असलो तरी आपल्या मागे आपली जबाबदारी ठाम पणे सांभाळली ती भाऊंच्या अर्धागीनी सौ रूपाली रायते यांनी. भाऊंच्या पाठीशी नेहमीच खंबीर पणे उभे  त्यांना वेळोवेळी आशीर्वाद दिला तो साक्षात आई वडिलांनी,त्याच बरोबर घरातील मोठ्या भावावरील भार आपल्या खांद्यावर घेवुन भावाला साथ दिली लहान भाऊ सतिश रायते याने.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात  काम करत असतांना त्यांचा मित्र परिवार इतर पक्षात ही मोठ्या प्रमाणात आहे त्या करता सामाजिक काम करण्यासाठी त्यांनी 2012 साली त्यांचे जिवा भावाचे सहकारी घेऊन  त्यांनी कर्तव्य सेवाभावी सामाजिक संस्थेची स्थापना केली. या अंतर्गत सातपूर कॉलोनीत छत्रपती शिवाजी महाराज जयंती, डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती, नवरात्र उसत्व आदी सामाजिक काम देखील केले. इतर पक्षातील लोकांची खंभीर साथीच्या जोरावर व त्यांच्या शुभेच्छाच्या जोरावर एकमेकांना चांगले सहकार्य प्राप्त झाले. जीवन भाऊंनी पवार साहेब व भुजबळ साहेब यांच्या विचाराला प्रेरित होऊन राष्ट्रवादी पक्षामध्ये काम करण्याचा निर्णय घेतला हा त्यांच्या निर्णय प्रवहाच्या विरुद्ध दिशेला नेणारा होता कारण त्यांचा मोठा मित्र परिवार व नातलग इतर पक्षात काम करत होते. सातपूर मध्ये राजकारणात एकनिष्ठतेचे उदाहरण द्यायचे असेल तर जीवन भाऊंचे नाव लोक आवर्जून नाव घेता आणि त्यांची (2006 साली वार्ड अध्यक्ष) पासून त्यांनी कामकाजाला सुरवात केली, तर आज विभाग अध्यक्ष असा तब्बल 14 वर्षाचा राजकीय प्रवास त्यांनी एकाच पक्षात केला. पक्षाचे सर्व जेष्ठ मंडळी व शहर अध्यक्ष रंजन भाऊ ठाकरे यांनी त्यांच्यावर विश्वस टाकत  सप्टेंबर 2017 साली  विभाग अध्यक्ष पदाची जाबाबदारी दिली त्यानंतरचा काळ आमच्या साठी भयानक होता या पक्ष ही सत्तेत नव्हता व नाशिक जिल्याचे पालक मंत्री आदरणीय भुजबळ साहेब व माजी खा. समीर भाऊ भुजबळ यांना राजकारणात  सत्ताधारी पक्षाकडून राजकीय हेतुपुरस्कर अडकवण्यात आल.
या काळात पक्षात काम करण खूप अडचणि आल्या जवळचे लोक ही साहेबा बद्दल व पक्षबद्दल वेगवेगळ्या चर्चा करू लागले , भुजबळ साहेब संपले पक्ष संपला तुम्ही ही पक्ष बदलून टाका अस खूप ऐकावं लागल परंतु त्यांचा आदरणीय पवार साहेबांवर विश्वास होता की पवार साहेब भुजबळ साहेबाना या प्रकरणातून नक्की बाहेर काढेल आणि भुजबळ साहेबनवर व समीर भाऊ वर ही त्यांचा खूप विश्वास होता की संघर्षातून घडणार हा नेता कधीच संपू शकत नाही याचीही त्यांना खात्री होतीच. नुकतेच महानगर पालिकेचे निवडणुका ही झाल्या होत्या निवडणुकीला काही लोक अपक्ष उमेदवारी करायला तयार होते पण राष्ट्रवादीचे तिकीट घ्यायला तयार नव्हते अशा परिस्थिती पक्षची जबाबदारी घेऊन  नव्याने पक्ष बांधणीची सुरवात केली जुने व नवीन युवक कार्यकर्ते घेऊन सातपूर राष्ट्रवादीला नव्याने उभारी दिली. त्या दरम्यान आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत काम करतांना  सामाजिक व राजकीय गोष्टीची जाणीव ठेवत प्रारंभिक 2006 साली सदस्य, वार्ड अध्यक्ष, प्रभाग अध्यक्ष,त्यानंतर विभाग सरचिटणीस त्यानंतर विभाग कार्याध्यक्ष,तर आता थेट विभाग अध्यक्ष असा राजकीय प्रवास करीत असतांना खर्या अर्थाने जेष्ठ मार्गदर्षक मधुकर आबा मौले,बाळासाहेब जाधव अशा नेत्याचे मार्गदर्षन लाख मोलाचे ठरले परंतु जिवाला जिव देणार्या मित्रांच्या सोबती व हिमती शिवाय काही गोष्टी कठिणच होत्या तरी देखील कौशल्यातुन मित्र व कार्यकर्ते यांना सांभाळुन घेवुन विभाग अध्यक्ष म्हणुन जबाबदारी पार पाडत असतांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सर्वच प्रमुख नेत्याची अत्यंत जवळीक साधत आपल्याकडे आलेल्या जनहिताचे सर्वच कामे चोख पार पाडले पक्षीय कामकाज बघत पक्षाच्या हितासाठी वेळोवेळी स्वत:ला झोकुन देवुन आंदोलन व निवेदना मार्फत आपली छाप पाडत विभागीय कार्यकारीणी मध्ये असंख्य तरूण पिढीचा सहभाग करून घेवुन नवतरूणांना पक्षाची नव ओळख करून दिली तसेच तीन वर्षापुर्वी पक्षातील कार्यकर्त्यांना मरगळ आल्याने पक्षीय कामकाज ठप्प होते अशा परीस्थितीत पक्षाची मोट बांधत विभागात सर्वत्र फिरूण नव्या जुन्या कार्यकर्त्यांना एकत्र आणुन नविन कामाला जोमाने सुरूवात केली यानंतर विविध स्तरावर सातपुर विभागातील प्रश्नांवर विरोधकांचे व प्रशासनाचे लक्ष वेधले मग त्षात सातपूर कॉलॉनीतील धोकादायक पाण्याच्या टाकीचा प्रश्न असो किंवा सातपुर बस स्नानका सारखा गंभीर प्रश्न असो किंवा आयटिआय पुलाला समांतर पुलाची मागणी करून त्या गोष्टींचा पाठपुरावा करून अधिकार्याना वेळोवेळी फोन करून काम पुर्णत्वास नेले.त्यामुळे नव कार्यरत्यामधे जोश निर्माण करून व आपल्या कार्याचा शिखर उभा करीत असतांना  सोबतच्या पदाधिकारी यांना पक्षाचे नूसते झेंडे न पकडता कोणत्या ना कोणत्या व्यवसायातून आर्थिक उत्पन्नचा मार्ग मिळून दिला, नंतर 2019 साली लोकसभा व विधान सभेच्या निवडणूक आल्या त्यादेखील जीवन भाऊंनी सर्वांच्या सोबतीने अतिशय कुशल पणे हाताळल्या, त्यांच्या कुशल कार्याची ओळख म्हणजे निवडणुकीच्या दरम्यान नाशिक शहरात सर्वप्रथम सातपूर विभागाने बाजी मारत बूथ यंत्रणा तयार केल्या, याकाळात त्यांनी त्यांच्या कार्याची छाप पाडत आदरणीय भुजबळ साहेब व समीर भाऊ भुजबळ यांचा सातपूर विभागातील अतिशय विश्वासू कार्यकर्ते म्हणून ही त्यांची विशेष ओळख तयार झाली म्हणूनच आदरणीय भुजबळ साहेब यांच्या सारखा बलाढ्य नेता जीवन भाऊ यांच्या घरी आले असावे.
नंतरच्या काळात करोना सारखी जागतिक महामारी आली व त्याकाळात ही हे मागे पडले नाही घाबरून घरी न बसता त्यांचे सहकरि घेऊन जागोजागी जेवण वाटप, किराणा वाटप, मास्क वाटप इतर अनेक उपक्रम यांनी या काळात ही राबवले यातही त्यांनी *संपूर्ण महाराष्ट्र नव्हे असा उपक्रम पक्षच्या माध्यमातून हाती घेतला तो म्हणजे नानफा नातोटा किराणा माफक केंद्र सातपूर विभागात असा उपक्रम राबवून सातपूर विभागात तब्बल 15 दुकाने सुरू केली  याकाळात गोरगरीब जनतेच्या खूप पैशांची बचत होऊन जीवन भाऊंच्या सामाजिक बंधीलकेच्या जाणिवेची चुणूक दिसून आली.
आदरणीय छगन रावजी भुजबळ साहेब, मा.खासदार समिर भाऊ भुजबळ,शहराध्यक्ष रंजन भाऊ ठाकरे,आदरणीय नाना साहेब महाले, अपूर्व भाऊ हिरे,दिलीप अण्णा खैरे,आदींचे अनमोल मार्गदर्षन लाभले आज विभागीय कामकाज पहात असतांना प्रत्येक गोष्टीत साथ लाभली असे त्यांचे सर्वच सहकारी व हित चिंतक यांच्या प्रेरनेनेच त्यांना सामाजिक व राजकीय काम करण्यास नेहमीच उत्तेजना मिळाली.

शब्दरचना व संकलन
विकास सोनवणे
विकास रायते
हर्षल आहेर
लोकेश कटारिया

Don`t copy text!