धुळे :नाशिक मिरर वेबटीम
धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील मालपुर येथे दि.७ नोव्हेंबर च्या रात्री रात्री लांडग्यांनी हल्ला करुन २४ मेंढयांना फस्त केले आहे.  या घटनेची दखल वन विभागाने घेतली असुन नुकसानीचा पंचनामा करण्यात आला आहे.
साक्री तालुक्यातील वाजदरे येथील पंडीक माणिक डोमाळे आणि बापू बारकु चोरमले हे मेंढयांचा वाडा घेवुन शिरपुरकडे जात होते. पण वाटेत त्यांनी मालपुर शिवारातील शेतात थांबण्याचा निर्णय घेतला. यासाठी जाळीच्या वाडयामधे सुमारे ४०० मेंढयांना ठेवुन हा परीवार रात्री विश्रांती करीत असतांना अचानक मध्यरात्री नंतर लांडग्याच्या कळपाने मेंढयांच्या वाडयावर हल्ला लढवला. त्यामुळे एकच गोंधळ उडाल्याने मेंढपाळ परीवार जागा झाला. त्यांनी मेंढयांना सावरण्याचा प्रयत्न सुरु केला. काही वेळानंतर लांडग्यांनी जंगलात पलायन केल्यानंतर पाहणी केली असता वाडयापासुन काही अंतरावर २४ मेंढया मृतावस्थेत आढळुन आल्या. तर काही मेंढयांना लांडग्यांनी चावा घेतल्याने त्या गंभिर जखमी झाल्याचे दिसुन आले. या घटनेची माहीती कळाल्याने वनरक्षक जेआर भोई यांनीघटनास्थळी भेट देवुन पाहणी करुन पंचनामा केला आहे.तर पशुधन विकास अधिकारी डॉ बी टी देसले , पशु वैदयकीय अधिकारी सुरेश राजभोस , पी व्ही चव्हाण आदीनी मयत मेंढयांचे जागेवरच शवविच्छेदन केले.

Don`t copy text!