रस्त्याची झाली दैना ; ट्राफिक पोलीसचे लक्ष केवळ कारवाई कडे
सातपूर : नाशिक मिरर वेबटीम
सातपूर औद्योगिक वसाहती मधील पपया नर्सरी वरील सिग्नल हा त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील महत्वपूर्ण सिग्नल आहे. सदर सिग्नल सातपूर-अंबड औद्योगिक वसाहती सोबत बाहेरील राज्यातून येणाऱ्याना मुंबई-पुणे-दिल्ली अशा प्रवाशी व औद्योगिक अवजड वाहनांना येथील सिग्नलने जोडलेले आहे. नाशिक शहरात दाखल होण्यासाठी व त्र्यंबकेश्वर या तीर्थक्षेत्र चे महत्व लक्षात घेता येथील सिग्नल यंत्रणा प्रभावी असणे आवश्यक आहे. त्याच सोबत येथील रस्ते देखील सुस्थितीत असणे आवश्यक असताना येथील सिग्नल वरील रस्त्याची चाळन झालेली दिसून येते. झेब्राक्रोसिंग नियम सागणारे वाहतूक पोलीस कर्मचारी यांना झेब्रा क्रोसिंगच गायब असल्याचे दिसून येत नाही. झेब्रा क्रोसिंग नसल्याने वाहने अगदी पुढे उभे राहतात.

सातपूर :१. पपया नर्सरी वरील वाहतूक सिग्नलवरील गायब असलेले झेब्रा क्रॉसिंग. २. सिग्नल वरील रस्त्याची झालेली दुरवस्था
नाशिक-त्र्यंबक रस्त्यावरून नाशिक वरून येणाऱ्या वाहनांना अंबडलिंकरोड ने अंबड एमआयडीसी कडे जाण्यासाठी मुख्यरस्त्या सोडून सर्विस रोड नसल्याने सिग्नल सुटण्याची वाट पहावी लागते. रस्त्याला लागुनच जाधव संकुल पोलीस चौकी असल्याने रस्त्यात अडथला ठरत आहे. सदर चौकी चे स्थलांतर करून पाठीमागे हटविण्याची मागणी अनेकांनी करून देखील सदर समस्याकडे दुर्लक्षित करण्यात येत आहे. सिग्नल वर नेमणूक केलेल्या वाहतूक पोलीस असून नसल्यासारखेच आहे. वाहतूक पोलिसाचे काम हे वाहतूक सुरळीत व नियंत्रित ठेवणे व वाहतुकीला शिस्त लावण्याचे आहे. परंतु येथील वाहतूक पोलीस विना हेल्मेट, वाहन विमा,लायसन्स तसेच परराज्यातील, परजिल्ह्यातील वाहने शोधून गर्दी मध्ये त्यांना भर रस्त्यात अडवून दंड वसुली च्या आड आर्थिक हित साधण्यात मुश्कील असतात. त्यामुळे येथील वाहतुकीचा भोजवरा उडालेला दिसून येतो.
