नाशिक मिरर वेबटीम : कोरोना व्हायरस शहरात झपाट्याने वाढत असल्याने प्रशासनाकडून आस्थापनांना निर्बंध लागू केले आहेत.
यात हाँटेल चालकांना देखील गर्दी होऊ नये याकरीता केवळ ५० टक्के ग्राहकांची व्यवस्था करण्याबाबत आदेशीत करण्यात आले होते. तरी देखील सदर नियमांचे उल्लंघन केल्या मुळे अशोकनगरच्या मुख्य रस्त्यावर असलेल्या सावकरनगर येथील संगत हाँटेलात नियमांचे उल्लंघन केले असल्याचे मनपा व पोलिस प्रशासनाच्या निर्दशनास आले.
यानंतर महापालिकेचे सातपूर विभागीय अधिकारी नितिन नेर, सातपूर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक किशोर मोरे यांनी हाँटेल पुढील आदेश मिळे पर्यंत सील करत कारवाई केली. जिल्हा प्रशासनाने ठरवुन दिलेली वेळ व नियम यांच्या उल्लंघन केल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल असे मनपा व पोलिस प्रशासनाच्या वतिने सांगण्यात आले.
