नाशिक मिरर : नाशिक महानगरपालिका सातपूर विभाग व सातपूर पोलिस प्रशासनाच्या वतिने अशोकनगर भाजी मंडईत संयुक्त पहाणी दौरा करण्यात आला होता. जिल्हा व मनपा प्रशासनाच्या आदेशानुसार भाजी मंडईत येणा-यांना कडून पाच रुपयांची पावती घेत आत सोडण्याबाबत प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. गर्दी होऊ नये म्हणून ठराविक नागरिकांना टप्प्या टप्प्यात सोडण्यात येत होते.मंगळवारी अशोकनगर भाजी मंडई मध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. मंगळवारी देखील बाहेर ग्राहकांच्या सायंकाळी रांगा लागल्या असल्याचे पहायला मिळाले.

 

यावेळी महापालिकेच्या कर्मचा-यांकडून मंडईत येणा-या प्रत्येक ग्राहकाकडून पाच रुपये घेत पावती दिली जात होती. भाजीपाला घेण्यासाठी केवळ एकाच व्यक्तीने यावे या हेतूनेच पाच रुपये प्रती व्यक्ती पावती केली असल्याचे
प्रशासनाच्या वतिने सांगण्यात आले. परंतु मंडई बाहेर भाजीपाला घेणा-या ग्राहकांच्या रांगाच लागल्या असल्याने सुरक्षित वावरचे पालन होत नसल्याचे समोर आले. करोना संसर्ग टाळण्यासाठी नागरीकांनी दिवसभर सुरू असलेल्या भाजी मंडईत भाजीपाला खरेदीसाठी यावे.

सायंकाळीच भाजीपाला घेण्यासाठी गर्दी करू नये असे आवाहन सातपूर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक किशोर मोरे यांनी केले.

 

बातम्या

Don`t copy text!