नाशिक मिरर : सोलापुर प्रतिनिधी
तालुक्यातील भुमीपुञांचा अभिमान असलेला आदिनाथ सहकारी साखर कारखान्यासमोर संचालक मंडळ नव्हे तर संधीसाधू राजकीय विरोधक अडचणी निर्माण करीत आहेत.जप्त मालमत्ता भाडेतत्वावर देण्याचा निर्णय संचालक मंडळाचा नाही तर प्रशासक मंडळाचा आहे.ही वस्तुस्थिती नाकारून संचालक मंडळावर खोटा आक्षेप नोंदवून आदीनाथला बदनाम करण्याचे विरोधकांचे षडयंञ आहे,असे स्पष्टीकरण देऊन कारखान्याच्या मार्गदर्शक संचालिका रश्मी बागल यांनी आदिनाथसाठी कुणाचाही बळी दिला जात नाही, जर कुणी स्वतःच्या राजकीय हितासाठी आदिनाथचे राजकारण करू पाहत असेल तर ते आम्ही होऊ देणार नाही असा इशारा विरोधकांना दिला आहे.

 

सोलापूर पंचक्रोशीत आदिनाथ साखर कारखान्याविषयी उठवलेल्या विविध प्रकारच्या वावड्यांना विरोधकांचे कारस्थान असे संबोधन देत रश्मी बागल यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतांना विरोधकांच्या नौटंकीची जंञीच सादर केली आहे.आपल्या स्पष्टीकरणात रश्मी बागल म्हणतातः विरोधकांकडून होत असलेली वारंवार अडवणूक व राजकारणामुळे आज आदिनाथ अडचणींचा सामना करतो आहे.

आदिनाथ कारखाना हा तालुक्याची व तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांची शान आहे , असे असताना देखील काही नतद्रष्टे मंडळी कारखान्याचे स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी राजकारण करू पाहत आहेत.
आदिनाथ साखर कारखाना २५ वर्षासाठी दुसऱ्यांच्या घश्यात घालण्याचा डाव आहे , वगैरे वगैरे अश्या प्रकारचा भ्रम सभासदांच्या मनात निर्माण करून आदिनाथ च्या विकासात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
आदिनाथ वर the maharashtra state co operative bank चे १२८ कोटी रुपयांचे कर्ज असून हे कर्ज फेडण्यासाठी कारखान्याकडून कारखान्याकडे असलेली जवळपास १०० कोटी रुपये रकमेची साखर विकण्याचा प्रयत्न वारंवार केला गेला.
परंतु विरोधकांनी काही संचालक आणि कर्मचार्यांना हाताशी धरून विक्रीस विरोध करण्यास प्रवृत्त करून वेळोवेळी साखर विक्री थांबवली.असे असताना शिखर बँकेने हे कर्ज फेडण्यासाठी कारखान्याची जप्त केलेली मालमत्ता भाड्याने देणेसाठी दिनांक ०४.१२.२०२० रोजी निविदा जाहिराती द्वारे सर्वात जास्त भाडे देणाऱ्या बारामती अग्रो ला २५ वर्षांसाठी भाडे करारावर देण्याचे ठरविले. सदर निर्णय हा बँकेच्या प्रशासकीय समितीने घेतला आहे,आदिनाथ स.सा.का.च्या संचालक मंडळाने नाही.आदिनाथ कारखान्याची विशेष सर्वसाधारण सभा घेण्यासाठी अपर जिल्हाधिकारी श्री. अमित देशमुख यांना परवानगी मागितली असता त्यांनी ती परवानगी देण्यास असमर्थता दर्शवली त्यांनी महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्याकडील दि. 14/3/2020 च्या अधिसूचनेनुसार, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपययोजनेचा भाग म्हणून परवानगी नाकारली .सहकारी कारखान्यांच्या सर्वसाधारण सभा online पद्धतीने 31 मार्च आधी घेण्याचा जी. आर. शासनाने जारी केला आहे.

कारखाना कुणी चालवायला घेतला ह्यापेक्षा कारखाना सुरू होणे, उसाची बिले वेळेवर मिळणे,कर्मचारी-वाहतूकदार-शेतकरी यांची राहिलेली देणी लवकर मिळणे सध्या अधिक महत्वाचे आहे.यावर्षी उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे
कोळगाव धरणामुळे पूर्व भागातील पाण्याचा प्रश्न मिटला आहे
मांगी प्रकल्पातही 100% पाणीसाठा आहे तसेच तालुक्यातील छोटे मोठे तलाव पूर्ण क्षमतेने भरले आहेत त्यामुळे पुढील काळात अतिरिक्त उसाचा गंभीर प्रश्न तालुक्यापुढे उभा राहू शकतो, म्हणून आदिनाथ कारखाना सुरू करणे गरजेचे आहे
शेतकरी बांधवांची सुद्धा ह्यासाठी वारंवार मागणी होत होती त्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील होतो शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष भेटीगाठी करूनच हा निर्णय घेण्यात आला आहे.

“कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील कामगार, ऊसतोड कामगार,ऊस वाहतूकदार आणि उसउत्पादक शेतकरी यांच्या असणाऱ्या अडचणी आता सुटतील,आदिनाथ कारखाना आदर्श पद्धतीने चालवण्याचा आपल्या सर्वांचाच मानस आहे
सतत होणारे राजकारण बाजूला काढून आदिनाथ कारखाना नियोजन बद्ध पद्धतीने चालवला जाईल.कारखाना सुस्थितीत येईल.”
-रश्मी बागल,मार्गदर्शक संचालक ,आदिनाथ सहकारी साखर कारखाना

बातम्या

Don`t copy text!