नाशिक मिरर वेबटीम :
छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने निवेदन राजेश टोपे
सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जालना चे पालकमंत्री यांना नाशिक जिल्हा तसेच शहरात कहर मांडणारा महाभयंकर संसर्गजन्य आजार कोविड १९ पुन्हा एकदा थैमान मांडू पाहत आहे,अशा काळात आर्थिकदृष्ट्या मध्यमवर्गीय तसेच दुर्बल कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांकडून उपचारा पूर्वी जादा डिपॉझिट घेऊनच त्या रुग्णावर उपचार केले जात आहे. त्यात ५० हजार ते १ लाखापर्यंत हॉस्पिटलचे डिपॉझिट तसेच लॅब,मेडिकलचे डिपॉझिट घेऊनच उपचार करतांना दिसून येत आहे. याविरोधात छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर व पदधिकाऱ्यांनी निषेध व्यक्त केला असून, नाशिक मध्ये कोविड १९ चे ( HRCT )रिपोर्ट करणारे सेंटरही या लुटमारीला अपवाद नाहीत.खाजगी हॉस्पिटल व डॉक्टर गोरगरीब नागरिकांची लूट करत असून त्यांचावर कारवाई करण्याची मागणी करण गायकर व छावा पदाधिकारी यांनी निवेदन द्वारे केली आहे.

दुसऱ्या बाजुला पालकमंञ्यांच्या आढावा बैठकीतून जिल्हा प्रशासन दाखवत असलेली परिस्थिती धादांत अवास्तव असल्याचे छावा क्रांतीवीर सेनेच्या निदर्शनास आले आहे. आढावा बैठकांमधून प्रशासन पातळीवर बेडस् व अन्य तत्सम उपाय योजनांबाबतही सांगीतली जात असलेली माहीती वास्तवात खोटी आढळून येत असून सामान्य रूग्णांची पावलापावलावर अडवणूक सुरू असून याविरूध्द उठणारा आवाजही दाबण्याचा प्रकार सुरू आहे.
आरोग्य मंत्री म्हणून याबाबत नाशिककरांना न्याय द्याल ही खाञी असल्याने सखोल चौकशी करून त्या डॉक्टरांवर तसेच हॉस्पिटल,HRCT रिपोर्ट करणाऱ्या सेंटरवर कारवाई करावी, ही छावा क्रांतीवीर सेना नाशिक जिल्हाच्या वतीने मागणी करण्यात आली आहे. यावेळी निवेदनावर जिल्हाध्यक्ष आशिष हिरे,शहराध्यक्ष योगेश गांगुर्डे, आदींसह पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.

 

          नाशिक मधील रुग्णालयांकडून असेच लूटमार सुरू राहिल्यास छावा क्रांतिवीर सेना रस्त्यावर उतरून या संधी साधूंना धडा शिकविल्या शिवाय राहणार नाही. त्यामुळे रुग्णालयांना याद राखा आता छावा क्रांतिवीर सेना तुमच्यावर लक्ष ठेवून आहे. जनतेला आज उपचाराची गरज आहे. डॉक्टरांनी आत्तापर्यंत देव-देवता सारखे कार्य केले आहे. पुढच्या काळातही त्यांच्याकडून असेच जनसेवेचे कार्य अपेक्षित आहेत. त्यामुळे या संकटाच्या काळात कोणीही संधीसाधूपणा करू नये हीच आमची अपेक्षा आहे. – करण गायकर , छावा क्रांतिवीर सेना संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य

बातम्या

Don`t copy text!