नाशिक मिरर : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्यामुळे सातपुर विभागात पुन्हा औषध फवारणी सुरू करण्यात आली असून नागरिकांना कोरोना पासून बचाव करण्यासाठी कोणती खबरदारी घ्यावी याबाबत प्रबोधन करण्यासाठी जनजागृती रथ फिरवण्यात येत आहे.प्रभाग क्रमांक ९ चे नगरसेवक दिनकर पाटील व युवा ऊर्जा फाउंडेशनचे अध्यक्ष अमोल पाटील यांनी यासाठी पुढाकार घेऊन प्रभाग क्रमांक ९ मधील परिसरात सदर उपक्रम राबविले जात आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून रुग्णालयात बेड मिळणेही दुरापास्त झाले आहे.तरी काही नागरिक प्रशासनाच्या सूचनाचे पालन करीत नसल्याने शेवटी राज्य सरकारने अशांत लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला आहे.
याच पार्श्वभूमीवर नगरसेवक दिनकर पाटील व अमोल पाटील यांनी सातपूर विभागात औषध फवारणी सुरू केली आहे.साथी आसरा कॉलनी,गंगापूर गाव व गोवर्धन गाव,एच एल कॉलनी,मळे विभाग,कोरडे मळा,ईडन सोसायटी,ध्रुवनगर,धर्माजी कॉलनी,शिवाजीनगर,श्रमिकनगर,राधाकृष्णनगर,संभाजीनगर,विश्वासनगर,स्वामी विवेकानंद नगर,पिंपळगाव बहुला,अशोक नगर आदी परिसरात निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे.इतकेच नव्हे तर नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी युवा ऊर्जा फाउंडेशनच्या वतीने परिसरात जन जागृती रथ फिरवण्यात येत आहे .
युवा ऊर्जा फ़ाउंडेशनच्या वतीने मोफत आर टी पी सी आर व मोफत ॲटिजेन तपासणी केंद्र सुरू करण्यात आले आहे.
रुग्णांचे त्वरित निदान होऊन त्यांच्यावर औषध उपचार करण्यासाठी सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक ९ मध्ये ठीक ठिकाणी मोफत ॲटिजेन व आरटीपीसी आर चाचण्या केंद्र सुरू केले आहे. तेथे मोफत चाचण्या केल्या जात असल्याने लक्षणे असणारे नागरिक स्वतःहून चाचण्या करण्यासाठी येत असल्याचे नगरसेवक दिनकर पाटील व अमोल पाटील यांनी सांगितले.
नाशिक शहरात कोरोना चे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत.तरी देखील नागरिक निष्काळजी पणे वावरताना दिसत आहे.त्यामुळे सातपूर परिसरात जनजागृती रथ भिरवला जात आहे.परिसरात फवारणी करून निर्जंतुक केला जात आहे.नागरिकांनी आवश्यक महत्वाचे काम असल्यास च घरा बाहेर पडावे. – अमोल पाटील , संस्थापक अध्यक्ष, युवा ऊर्जा फ़ाउंडेशन
