नाशिक मिरर : सातपूर – अंबड औद्योगिक वसाहती मध्ये राज्य शासनाने राज्यात कोविड १९ वाढत पार्श्वभूमीवर ब्रेक दि चेन चे राज्यात आदेश जारी केले आहे.त्या आदेशानुसार सातपूर- अंबड औद्योगिक वसाहती मध्ये किराणा दुकाने, मेडिकल, दवाखाने, भाजीविक्रेते, फळविक्रेते अशा अत्यावश्यक सेवा वगळून सातपूर व अंबड भागात इतर दुकाने १०० टक्के बंद होते. नागरिक,व्यापारी, दुकानदार यांनी देखील राज्य शासनाच्या आवाहन प्रतिसाद दिला आहे.सातपूर खोका मार्केट मध्ये अनेक टवाळखोर करणारे मुले गर्दी करताना दिसून आले.सातपूर-अंबड औद्योगिक वसाहती मधील कारखाने सुरळीत सुरू होते. कंपनी व्यवस्थापक यांना कामगारांची काळजी घेण्यास सांगितले आहे. सर्व नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे.
