सातपूर मधील सर्व घंटागाड्या थेट कचरा डेपोत न जाता अगोदर भंगारच्या दुकानात वर कमाई जोऱ्यात

नाशिक मिरर वेबटीम : सातपूर परिसरात तुंबलेले चेंबर न सापडल्याने बांधकाम विभागाने चक्क ७० हजार रुपयांचा खर्च करून नवीन ड्रेनेज लाईन टाकल्याची बाब नगरसेवक सलीम शेख यांनी सातपूर प्रभाग समितीच्या बैठकीत उघड केली. दरम्यान प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश सभापतींनी दिले. सातपूर प्रभाग समितीची बैठक शुक्रवारी (दि.२९) सभापती रवींद्र धिवरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी घंटागाडी, अतिक्रमण, बांधकाम, उद्यान, आरोग्य अशा विविध विभागातील विषयांवर चर्चा होऊन संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले.  प्रभाग ११ मध्ये किरकोळ कामासाठी नवीन ड्रेनेज लाईन का टाकली? असा सवाल नगरसेवक सलीम शेख यांनी उपस्थित करून भुयारी गटार व बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली. मात्र या दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांना उत्तर देता आले नाही. विशेष म्हणजे तीन दिवस चेंबरच सापडला नसल्याने नवीन लाईन टाकण्यात आल्याचे केविलवाणे उत्तर सभागृहात ऐकण्यास मिळाले. या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश सभापती धिवरे यांनी दिले.  दुर्गंधी येत असल्याचे कारण सांगून सातपूर विभागातील घंटागाड्या थेट द्वारका येथे उभ्या केल्या जात आहेत. त्यामुळे सातपूर  विभागातील कर्मचाऱ्यांना द्वारका येथून घंटागाडी घेऊन यावे लागते.  यात त्यांच्या पेट्रोल खर्च वाढत असून वेळही वाया जात असल्याने या घंटागाड्या पुन्हा सातपूर विभागातच उभ्या करण्यात याव्यात अशी मागणी सदस्यांनी केली. नगरसेवक भागवत आरोटे यांनी जेसीबी चा मुद्दा उपस्थित करून मोकळ्या प्लॉटवरील कामकाजाचे तास कसे मोजले जातात? असा प्रश्न उपस्थित केला. यावरही अधिकाऱ्यांना समर्पक उत्तरे देता आली नाहीत. उघड्यावर मांस विक्री का बंद केली जात नाही? अतिक्रमण विभागाचे काही लागेबंधे आहेत का? असा सवाल उपस्थित करून आरोटे यांनी संबंधितांना जाब विचारला. नगरसेविका सीमा निगळ यांनी मटन मार्केटच्या नूतनीकरणासह  कामाच्या दर्जाबाबत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. नगरसेविका माधुरी बोलकर यांनी कचऱ्याचा प्रश्न उपस्थित करून  प्रभागातील ब्लॅक स्पॉट कमी करण्याची मागणी केली. नगरसेवक मधुकर जाधव यांनी बांधकाम व्यावसायिकांचा प्रश्न उपस्थित करताना नवीन वसाहतीतील कामांसाठी महापालिकेला पैसे अदा केले जातात. मात्र अशा वसाहतींना दोन दोन वर्ष सुविधा का दिली जात नाही? असा प्रश्न उपस्थित केला. नगरसेविका पल्लवी पाटील यांनीही अतिक्रमण व स्वच्छतेबाबत जाब विचारला. तर फांद्यांच्या छाटनी वरून अधिकाऱ्यांना बांगड्यांचा आहेर  देण्याचा इशारा नगरसेविका इंदुबाई नागरे व  अलका अहिरे यांनी दिला.

ठराव असतानाही परस्पर नाव..

कॉलनी येथील नामदेव शिंपी सभगृहाजवळ महिलांसाठी योगा हॉल तयार करण्यात आला आहे. या हॉलला ‘सावित्रीबाई फुले योगा हॉल’ असे नाव देण्याचा ठराव दोन वर्षांपूर्वीच महासभेत करण्यात आला आहे. असे असतानाही संबंधित अधिकाऱ्यांनी परस्पर ‘नाशिक महापालिका योगा हॉल ‘  असे नामकरण केल्याने नगरसेवक सलीम शेख व सीमा निगळ यांनी अधिकाऱ्यांवर आगपाखड केली.

सातपूर विभागात 44 घंटागाड्या असून या सर्व घंटागाड्या थेट कचरा डेपोत न जाता अगोदर भंगारच्या दुकानात जात असल्याचाही आरोप करण्यात आला. या मोबदल्यात ठेकेदारास एका गाडीचे दोनशे रुपये दिले जात असून 44 गाड्या गुणिले 200 रुपये म्हणजेच 8 हजार आठशे रुपये मिळत असल्याचाही गौप्यस्फोट नगरसेवक सलीम शेख यांनी करून आरोग्य विभागात सेल्फी पासून तर ३०  दिवस कामावर येण्यासाठीही कर्मचाऱ्यांकडून पैसे वसूल केले जात असल्याचे सभागृहास सांगितले.

ठरावा असतानाही परस्पर नाव.. 
कॉलनी येथील नामदेव शिंपी सभगृहाजवळ महिलांसाठी योगा हॉल तयार करण्यात आला आहे. या हॉलला ‘सावित्रीबाई फुले योगा हॉल’ असे नाव देण्याचा ठराव दोन वर्षांपूर्वीच महासभेत करण्यात आला आहे. असे असतानाही संबंधित अधिकाऱ्यांनी परस्पर ‘नाशिक महापालिका योगा हॉल ‘  असे नामकरण केल्याने नगरसेवक सलीम शेख व सीमा निगळ यांनी अधिकाऱ्यांवर आगपाखड केली. 

बातम्या

Don`t copy text!