नाशिक मिरर वेबटीम : सातपूर मध्ये एका ५७ वर्षीय इसमाने घरात कोणीही नसल्याची संधी साधत घरा शेजारीच राहणाऱ्या आठ वर्षीय अल्पवयीन बालिकेला पाणी देण्याच्या बहाणा करुन घरात बोलहून, घराची कडी लावून अल्पवयीन बालिकेवर बलात्कार केल्याची घटना घडल्याने सातपूर परिसरात एकच खळबळ उ़डाली आहे.
     सातपूर कॉलनी परिसरात पत्नी पासून विभक्त राहणारा आणि कोणताही कामधंदा न करणारा आरोपी सुनील भाटे (वय. ५७ रा.सातपूर कॉलनी) रिकामटेकडा इसम घरात पत्नी अन्य कोणी राहत नसल्याने त्याचा फायदा घेत बलिकेवर अत्याचार केला.काल शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास  रडतच बाहेर आल्याने आईला संशय आल्याने तिच्या फिर्यादीवरुन संशयित आरोपींवर लहान बालकाचे संरक्षण कायदा पोस्को अंतर्गत सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करुन आरोपींला अटक करण्यात आली आहे.शनिवारी या संशयितांस न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्याची २ फेब्रुवारी पर्यत पोलिस कस्टडी सुनावली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस उपनिरिक्षक सुकदेव काळे करीत आहे.

बातम्या

Don`t copy text!