लाखो रुपयांचे विरंगुळा केंद्र बनले गोडाऊन
नाशिक मिरर :
सातपूर येथील अशोकनगर बसथांब्या शेजारी अशोकनगर भागातील जेष्ठ नागरिकांसाठी बनवण्यात आलेल्या जेष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रावर अशोकनगर रोड वरील ना फेरीवाला क्षेत्र मध्ये अतिक्रमण करून हात विक्री करणारे व्यवसायिकानी अतिक्रमण करून ताबा मिळवला आहे.
विरंगुळा केंद्रा मध्ये चक्क रस्तावर विक्री करण्यात येणाऱ्या वस्तूचा साठा करून गोडाऊन तयार केले आहे. विशेष सदर विरंगुळा केंद्राला कुलुप लावून चावी देखील सदर हातगाडी विक्रेत्याकडे आहे.आतील वस्तू दिसू नाही म्हणून पडदा लावून झाकून ठेवण्यात आले आहे.याकडे सातपूर विभागीय कार्यालय मधील अधिकारी , अतिक्रमण विभाग यांचे दुर्लक्ष झालेले दिसून येत असून, सदर वास्तू उभारण्या साठी नाशिक मनपाने लाखो रुपये खर्च केले आहे.
अशोकनगर भागात मोठ्या संख्येने जेष्ठ नागरिक असल्याने जेष्ठ नागरिक वेळ घालवण्यासाठी अशोकनगर बसथांबा व इतर ठिकाणी बसत असल्याचे दिसून येत होते.त्यामुळे प्रभाग क्रमांक १० नगरसेविका माधुरी बोलकर व इंदूबाई नागरे यांनी पुढाकार घेऊन दोन वर्षापूर्वी अशोकनगर रोड लगत जेष्ठ नागरिकां साठी विरंगुळा केंद्र बांधून सुरू केले. सदर ठिकाणी जेष्ठ नागरिकांना वाचण्यासाठी सर्व वृत्तपत्रे, पुस्तके आदी एका वाचनालय तर्फे ठेवण्यात आली होती. यामुळे परिसरातील जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सदर ठिकाणी येत होते.परंतु नाशिक मनपा सदर चालकास जादा भाडे आकारणी केल्याने सदर चालकाने सदर ठिकाण चे वाचनालय बंद केले.त्यानंतर सदर विरंगुळा केंद्र धुळखात पडून असल्याने सदर विरंगुळा केंद्राचा वापर आता हात विक्रेते गोडाऊन म्हणून करीत आहे. मनपा प्रशासनाने सदर विरंगुळा केंद्र व बाहेरील अतिक्रमण हटवून सदर केंद्र पुन्हा जेष्ठ नागिरका साठी सुरू करण्याची मागणी परिसरातील जेष्ठ नागरिकांनी केली आहे.
