नाशिक मिरर : सातपूर राजवाडा मधील
एक बंद पडक्या घरामध्ये दि.१ एप्रिल रोजी स्त्री जातीचे कुजलेल्या अवस्थेत अर्भक सापडले आहे. सदर अर्भक प्लास्टिक गोणी मध्ये गुंडाळून ठेवण्यात आले होते.
माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली असून सदर अर्भक अज्ञात इसमाने तीन दिवसांपूर्वी ठेवले असावे असा अंदाज सातपूर पोलिसांनी पंचनामा करतेवेळी व्यक्त केला आहे. मुलगी नको म्हणून अर्भक टाकून दिले की, अवैध संबंधातून मुंल जन्माला आले म्हणून टाकून दिले असावे असे प्रथम दर्शनी दिसून येत आहे. अर्भक टाकून जाणाऱ्या नराधम इसमाचा व अर्भका च्या आई चा सातपूर पोलीस परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे व इतर माहिती तपासून शोध घेत आहे.

