नाशिक मिरर वेबटीम : सातपूर मधील प्रभाग क्रमांक ११ मधील प्रबुद्ध नगर १० हजार लोकसंख्या असलेल्या वसाहतीतअनेक नागरी समस्या निर्माण झाल्या असून नागरीकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते आहे.याबाबत सामाजिक कार्यकर्ते बजरंग शिंदे व माजी नगरसेविका ज्योती शिंदे यांनी समस्या सोडवण्यासाठी मनपा आयुक्त कैलास जाधव यांना निवेदन दिले आहे. प्रबुद्ध नगर परिसरातील मुख्य रस्ते २ वर्षांपासून खोदून ठेवलेले असून त्याचे काँक्रीट करणं करण्यात यावे,संतरोहिदास महाराज चौकातील शौचालय हे जुने व जीर्ण झाले असून सगळे भांडे,आउटलेट पाईपलाईन तुटलेले अवस्थेत आहे त्यामुळे महिला,वृद्ध,लहान मुले यांना उघड़यावर शौचालय साठी जावे लगते त्या मुळे नागरिकांनाची गैरसोय होत आहे तरी सदर शौचालय तोडून नवीन बांधण्यात यावे,अनेक ठिकाणी ड्रेनेज लाईन चोकअप झाल्या असून ड्रेनेज चे सांडपाणी रस्त्यावर वहात आहे अनेक ठिकाणी तर ड्रेनेज ची पाइप लाइन टाकलेली नाही त्या मुळे परिसरात आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.प्रबुद्ध नगर येथील उर्वरित घरंना स्लम चार्जेस आकारणी करण्यात यावी. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरातील संरक्षक जाळ्या व गेट तुटले आहे तसेच पुतळा पाठीमागे भिंती च्या फरश्या तुटल्या आहेत त्या त्वरित दुरुस्ती करण्यात यावी. वसाहतीमध्ये डेंगू,मलेरिया, जणतूनशक फवारणी करावी,स्वच्छता कर्मचारी संख्या वाढवावी,वसाहतीतील अनेक चौकातील पथदिवे बंद आहेत ते त्वरित सुरू करण्यात यावे, वासाहितीमध्ये कुत्रांचा सुळसुळाट असून त्याचा त्वरित बंदोबस्त करण्यात यावा,प्रबुद्ध नगर मधील अंतर्गत पाणीपुरवठा कमी दाबाने होत असून तो सुरळीत करण्यात यावा, अशा मागण्या निवेदनात नमूद करण्यात आल्या आहेत.निवेदन देतेवेळी कैलास सोनवणे,देविदास अहिरे,अशोक पवार,संतोष जाधव,अशोक वाव्हळे,देवराम पगारे,रमेश मोरे, रामदास पालवे आदी सह नागरिक उपस्थित होते.
