नाशिक मिरर वेबटीम : विभागातील शिवाजीनगर,गंगापुर,धृवनगर, श्रमिकनगर,अशोकनगर, सातपूर कॉलनी आदि भागातील बस फेऱ्या कमी असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत असून पालकांना खाजगी रिक्षा व वाहतुकीचा आर्थिक भ्रूदंड सहन करावा लागत आहे. परीसरातील विद्यार्थ्यांनी नाशिक भाजपा युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष अमोल पाटील यांच्या कडे तक्रार केली असता, दि.२ फेब्रुवारी रोजी शाळा महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांसह राज्य परिवहन महामंडळ कार्यालयात परिसरात बसफेऱ्या वाढविण्याची मागणी अमोल पाटील यांनी यावेळी केली. कोरोना महामारी मुळे शाळा ,कॉलेज बंद होती.परंतु आता शासनाने टप्प्याटप्पाने सर्व सुरळीत केल्याने शाळा व महाविद्यालये देखील सुरू झाली आहेत.सातपूर भागातून नाशिक शहरात मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी जात आहेत.त्याच्या साठी बसफेऱ्या वाढवण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक नितीन मैंद, विभागीय वाहतूक अधिकारी वृषाली भोसले यांना शहरातील बससेवा त्वरीत सुरू करा तसेच शिवाजीनगर येथील बसपास केंद्र सुरू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.सातपूर मधील शहरातील बससेवा सुरू ठेवण्याच्या लेखी आश्वासनाची मागणी करत विद्यार्थ्यांसह अमोल पाटील यांनी बसून घेत ठिय्या यावेळी आंदोलन केले.राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक नितीन मैंद यांच्या आदेशानुसार विभागीय वाहतूक अधिकारी वृषाली भोसले यांनी त्वरीत बससेवा तसेच बसपास केंद्र सुरू करण्याचे लेखीपत्र देण्यात आले.
