नाशिक मिरर वेबटीम : सातपूर प्रबुद्ध नगर मधील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे यांच्या आमदार निधीतून पाठपुराव्यामुळे मार्गी लागला आहे. आ. सीमा हिरे यांच्या आमदार निधीतून दिनांक १ फेब्रुवारी २०२१ रोजी सातपूर प्रभाग क्रमांक ११ येथील प्रबुद्ध नगर येथे अंतर्गत पिण्याच्या पाण्याची नवीन पाईप लाईन टाकणे याचा भूमिपूजन समारंभ व हळदीकुंकू समारंभ कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थिताचे स्वागत महिला मोर्चा अध्यक्ष संगीता शेळके यांनी केले .यावेळी मनोगतात आ. हिरे यांनी सांगितले की, प्रभाग क्रमांक ११ मध्ये जवळपास ४ कोटीची कामे करण्यात आली असुन यापुढेही प्रबुध्दनगर येथे सुलभ शौचालय पिण्याच्या पाण्याचा उच्च दाबाने पुरवठा होण्यासाठी एक्सप्रेस लाईन टाकणे यास्वरुपाची कामे मंजुरीस्तरावर आहेत. प्रबुध्द नगरचा संपूर्ण विकास होणार असल्याने संपूर्ण प्रबुध्दनगर समस्येचे गर्तेतुन बाहेर येणार आहे. यावेळी कार्यक्रमासाठी नाशिक शहर उपाध्यक्ष रामहरी संभेराव, प्रदेश महिला पदाधिकारी रोहिणी नायडू, नाशिक शहर महिला मोर्चा सरचिटणीस रश्मी हिरे ,सातपूर मंडळ सरचिटणीस भगवान काकड ,उपाध्यक्ष संदीप काळे , अशोक पवार,पगार सर, संतोष सरकटे, शाखा अभियंता घोलप, मक्तेदार राजेंद्र माळी, सुशिल नाईक, शंकर कुरमी, मनीषा गांगुर्डे ,वत्सला गीते, लक्ष्मी अहिरे,सिंधु।आहेर, भुरा आहिरे, कलासोनवणे, परिसरातील महिला व नागरिक यावेळी उपस्थित होते.
