नाशिक मिरर वेबटीम : नाशिक महापालिकेच्या शिवसेना गटनेता कार्यालयाला शुक्रवारी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. शिवसेना गटनेते विलास शिंदे यांचे कार्यालय यांमध्ये भस्मसात पडले आहे.नाशिक महानगरपालिका राजीव गांधी भवन मधील हा कक्ष दुसऱ्या मजल्यावर आहे. या आगीमुळे महापालिकेच्या मुख्यालयात एकच खळबळ उडाली. आग विझवण्यासाठी अग्निशमन बंब दाखल झाला असून जीवितहानी झाली नसल्याचे कळत आहे. या भागात मोठ्या प्रमाणावर धुराचे लोळ तयार झाले असल्याने कामात अडथळा येत आहे. त्यामुळे कार्यालयाचे दरवाजे आणि खिडक्या उघडण्यात आले आहे. अग्नी शमन जवान आग विझवण्याचे काम करत आहेत.प्राथमिक माहिती नुसार शॉर्टसर्किट मुळे आग लागल्याचे समजते आहे.

बातम्या

Don`t copy text!