वर्षभरात दोन टप्प्यात एकूण ५५ लाखाचे कामे केले जाणार
नाशिक मिरर वेबटीम : गंगापूर रोड वरील प्राचीन व ऐतिहासिक सोमेश्वर महादेव मंदिर परिसरात विविध विकास कामाचे भूमिपूजन शुक्रवार दि.२२ जानेवारी रोजी शिवसेना गटनेते तथा प्रभाग क्र.८ चे नगरसेवक विलास शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. श्री.सोमेश्वर महादेव मंदिर ट्रस्ट च्या निधीमधून पहिल्या टप्प्यात महाशिवरात्री पर्यंत २० लाख रुपये चे काम तर दुसऱ्या टप्प्यात ३५ लाख रुपये चे काम पूर्ण करण्यात येणार आहे.पहिल्या टप्प्यात राम-जानकी मंदिर,लक्ष्मी-नारायण मंदिर, ट्रस्टचे कार्यालय समोर नव्याने फडशी फसवणे, व्हॉल कंपाऊंड ची दुरुस्ती करणे,बेंच बसवणे, भाविकांना बसण्याची सोय करणे आदी कामे करण्यात येणार आहे.सदर कामास संस्थेच्या बैठकीत सर्व पदाधिकारी व सदस्य यांची मंजुरी घेऊन चारिटी कमिशनर परवानगी घेऊन ई-निविदा द्वारे ठेकेदार ची नेमणूक करून काम देण्यात आले आहे.तसेच दुसऱ्या टप्प्यात ट्रस्ट कार्यलया जवळ वाचमन साठी खोली बांधणे, रामसीता हॉल वर सौर-ऊर्जा प्रकल्प राबवून संपूर्ण परिसर सौर ऊर्जा वर कार्यान्वित करणे, संस्थान सर्व जागेस कंपाऊंड करणे, आदी कामे प्रस्तावित आहेत.यामधील बहुतेक कामे भाविकांनी केलेल्या सूचना नुसार केले जात असल्याची माहिती ट्रस्ट चे अध्यक्ष अँड. बापूसाहेब गायकर यांनी दिली.याप्रसंगी प्रमोद गोरे उपाध्यक्ष, बाळासाहेब लांबे सेक्रेटरी, गोकुळ पाटील खजिनदार, राहुल बर्वे , हरिश्चंद्र मोगल, अविनाश पाटील, देवेंद्र भुतडा, शामसिंग परदेशी विश्वस्त, व व्यवस्थापक दिनेश भामरे, मुरली पाटील, बाळासाहेब पाटील, ज्ञानेश्वर पाटील, दत्ता पाटील, नाना कटलग, विजय शिंदे, आदीसह भाविक उपस्थित होते.

