नाशिक मिरर वेबटीम : आज सायंकाळी दिंडोरी तालुक्याला अवकाळी पावसाचे गारपीट झाल्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसह सर्वात शेतकरी वर्गांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. संपूर्ण तालुक्यास आज वादळ वाऱ्यासह काही ठिकाणी गारपीट झाल्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या गारपिटीमुळे शेतकरी वर्गाचे गहू हरभरा भाजीपाला पिके यासह सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकरी वर्ग मोठ्या अडचणीत सापडला आहे. आज सायंकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान दिंडोरी तालुक्यातील जानोरी, मोहाडी, दिंडोरी,खडक ,सुकेना ,खेडगाव, शिंदवड, नळवाडी, चिंचखेड या परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली त्यामुळे तयार झालेल्या द्राक्ष पिका सह सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शेतकरी वर्ग मोठ्या अडचणीत सापडला आहे.
