नाशिक मिरर वेबटीम : श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन सातपूर शिवजन्मोत्सव समिती च्या वतीने दरवर्षी प्रमाणे करण्यात आले आहे. प्रा. शिव शाहीर प्रवीण जाधव यांचा संगीतमय शिवचरित्रावर आधारित गर्जते मराठी शायरी पोवाडा कार्यक्रम दि.१८फेब्रुवारी रोजी सायंकाळी आठ वाजता संपन्न होणार आहे .श्री छत्रपती शिवरायांचा पाळणा सातपूर परिसरातील माता -भगिनींच्या उपस्थितीत छत्रपती शिवरायांचा रात्री अकरा वाजता होणार आहे.जाणता राजा मैदान येथे शिवजन्मोत्सव समिती वतीने शिवतीर्थ अर्थात शिवरायांचे देखणे मंदिर उभारले जात आहे. या शिवमंदिरात रामशेज किल्ल्यावरील पवित्र माती चा कलश दर्शनासाठी ठेवला जाणार आहे. शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला १८ फेब्रुवारी रोजी रात्री बारा वाजता ढोल-ताशांच्या गजरात आणि शिवभक्तांच्या उपस्थितीत छत्रपती शिवरायांची महाआरती संपन्न होणार आहे. दि.१९ फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजता सातपूर भाजी बाजार जवळील शिवछत्रपती महाराजाचा पुतळा येथे समितीच्या वतीने सकाळी साडेनऊ वाजता पूजन केले जाणार आहे.जानता राजा मैदानावर शिवप्रेमींच्या उपस्थित मंदिरातील शिवप्रतिमेचे अभिषेक व पूजन केले जाणार आहे. सायंकाळी पाच वाजता मान्यवरांचे स्वागत व सत्कार समारंभ होणार आहे.सायंकाळी सहा वाजता कार्यक्रमस्थळी मुख्य प्रवेशद्वारापासून सातपूर परिसरात शोभायात्रा काढण्यात येणार आहे. सायं. सात वाजता श्री .तुळजाभवानी आणि शिवरायांची महाआरती होणार आहे.त्यानंतर शंभूराजे या महानाट्यस सुरुवात होणार आहे. हिंदवी स्वराज्य निर्मितीचे वैभवशाली महाराजांचे शिवपूर्व प्रा. नितीन बानगुडे पाटील लिखित आनंद जावडेकर यांनी दिग्दर्शित श्री संभाजी महाराजांच्या भूमिकेत मयूर घोलप भूमिका करणार आहेत.तसेच नेत्रदीपक आकर्षक आताषबाजी अत्याधुनिक ध्वनी व प्रकाश योजना , छत्रपती संभाजी महाराज जन्म ते त्याच्या बलिदानापर्यंत चा धगधगता इतिहास दाखविणारे अभिजात लोककलांनी नटलेला भव्य ऐतिहासिक सोहळा संपन्न होणार आहे.सदर कार्यक्रम सर्व सातपूर व नाशिककरांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सातपूर शिवजन्मोत्सव समिती च्या वतीने करण्यात आले आहे.
