नाशिक मिरर वेबटीम : नाशिक मधील आंदवली गावातील रहिवासी रमेश वाळू मंडलिक (वय ७५ )यांचा गळा चिरून खून झाल्याची घटना दि.१७ फेब्रुवारी रोजी ७ वाजेच्या सुमारास घडली असल्याची प्राथमिक माहिती समजते आहे. जमिनीच्या वादातून हा खून झाल्याचे प्रथमदर्शनी सूत्रांकडून माहिती मिळाली. तपासासाठी संशयित आरोपीना ताब्यात घेतले असून, नातलगांमध्ये झालेल्या वादामधून सदर प्रकार घडला असल्याचे समजते आहे. गंगापूर पोलीस स्टेशन हद्दी जवळील आंनदवली पोलीस चौकी बाजूला असलेल्या इमारती जवळ हा प्रकार घडला आहे. या बाबतीत अनेक तर्क-वितर्क लावण्यात येतं आहे.घटनास्थळी श्वान पथकासह गंगापूर पोलीस अधिक तपास करत आहे.
