नाशिक मिरर :
सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या युवा ऊर्जा फाउंडेशन व प्रभाग क्रमांक ९ चे नगरसेवक दिनकर पाटील यांच्या वतीने प्रभागातील २० हजार गरीब कुटुंबीयांना मोफत भाजीपाला वाटप करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. मंगळवार (दि.१८) पासून या उपक्रमास सुरुवात करण्यात आली. युवा उर्जा फाउंडेशनच्या वतीने दर महिन्याला निराधार महिलांना मोफत किराणा साहित्य दिले जाते. मागील वर्षी लॉक डाऊन जाहीर झाल्यानंतर शिवाजीनगर, श्रमिकनगर, ध्रुवनगर, गंगापूर गाव या भागातील नागरिकांना मोफत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप व मोफत ॲंटीजेन व मोफत आर टी पि सि आर करण्यात आले होते. व एकाही मोफत ॲंटीजेन व मोफत आर टी पि सि आर करण्यात आलेले आहे.
त्याच धर्तीवर या वर्षीही सुमारे २० हजार कुटुंबियांना मोफत भाजीपाला वाटप केला जात आहे. एका किट मध्ये टोमॅटो, वांगी, कोबी,शिमला वस्तूंचा समावेश आहे. नगरसेवक दिनकर पाटील ,माजी नगरसेविका लता पाटील व युवा उर्जा फाऊंडेशनचे अध्यक्ष अमोल पाटील, यांच्या उपस्थितीत या उपक्रमास सुरुवात करण्यात आली.
मोफत शव वाहिकाही उपलब्ध
फाउंडेशनच्या माध्यमातून कोरोना काळात व कायमस्वरुपी
मृत पावलेल्यांसाठी मोफत शव वाहिका,रुग्णवाहिका ,शवपेटी व उपलब्ध करून देण्यात आली आहे.कोरोना नियमांचे पालन
भाजीपाला पॅकिंग करताना कोरोना नियमाचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. पॅकिंगचे काम करणाऱ्या मुलांच्या डोक्यात सेफ्टी कॅप व हँडग्लोज देण्यात आले आहेत. तसेच वाहतूक करणाऱ्या वाहनांचेही निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. भाजीपाला वाटप करतानाही सोशल डिस्टंसिंगचे पूर्णपणे पालन केले जात आहे.- अमोल पाटील,युवा उर्जा फाउंडेशन
