नाशिक मिरर वेबटीम : सातपूर औद्योगिक वसाहती मध्ये एका नामांकित कंपनी च्या गेट बाहेर कंत्राटी कामगाराची पगार घेण्यासाठी मोठी गर्दी जमा झाली होती.यावेळी सदर मुख्य रस्तावर मोठ्या प्रमाणात गोंधळ झालेला दिसून आला.याबाबत अधिक माहिती अशी की, शुक्रवार दि.१५ जानेवारी रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास सातपूर औद्योगिक वसाहती मधील ट्रॅव्हल बँग बनवणाऱ्या व्हीआयपी कंपनी बाहेर कंत्राटी कामगारांनी ठेकेदार कडून महिन्याचा पगार घेण्यासाठी तब्बल ३०० कामगारांनी गर्दी केली होती.यामध्ये मोठ्या प्रमाणात महिला व युवती देखील होत्या.रस्तावर अचानक पणे अशी गर्दी दिसून आल्याने काही घटना च घडली की काय, असा प्रश्न रस्तावरून जाणाऱ्या वाहनचालकांना पडली होती.त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.कोविड १९ (कोरोना व्हायरस )चा प्रादुर्भाव अजून शहरात कायम असून, नियमांचे पालन करणे अजून बंधनकारक आहे .तरी देखील सदर ठेकेदार व कंपनी व्यवस्थापक इतक्या मोठ्या संख्येने कामगार एकत्र करीत असल्याचे दिसून आले.कोणीही सामाजिक अंतर व वा मास्क परिधान केले नसल्याचे दिसून आले.तसेच अशा प्रकारे रात्री पगार वाटप करणे योग्य आहे का असा प्रश्न देखील यामुळे उपस्थित होत आहे.

बातम्या

Don`t copy text!