नाशिक मिरर वेबटीम : नाशिक शहर पोलीस आयुक्तलय व सातपुर पोलिस ठाण्याचा कर्मचारी असे एकूण तीन पोलीस कर्मचारी हिरामण गणपत सोनवणे, सारंग एकनाथ वाघ, राहुल पोपट गायकवाड अशी संशयित लाचखोर पोलिस एसीबी च्या जाळ्यात अटकले आहेत. लाचलुचपत विभागाने सापळा रचून १३ हजाराची लाच घेतांना रंगेहात पकडले.
दरम्यान अपघाताचे प्रकरण मिटविण्यासाठी ,अपघाताच्या गुन्ह्यात अटक न करण्याच्या मोबदल्यात २५ हजार ची लाच संबंधित कर्मचारी यांनी मागितली होती. त्यापैकी १३ हजार रुपयांची लाच सातपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील राधाकृष्णनगर मधील बोलकर व्हॅली पोलीस चौकीत स्वीकारणाऱ्या तिघा पोलीस कर्मचाऱ्याना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून कारवाई केली अशी माहिती सूत्राकडून समजते आहे. रात्री उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सातपूर पोलीस ठाण्यात सुरु होते.या लाचलुचपत विभागाच्या कारवाईमुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

