नाशिक मिरर च्या पाठपुराव्याला यश
नाशिक मिरर वेबटीम : सातपूर औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांवर घंटागाडीला टोचण करुन नेतांना चालकाच्या चुकीमुळे रोशनी जयस्वाल ही तरुणी ठार झाल्याची दुर्दैवी घटना दि.१७ डिसेेबरला घडली होती. काल महापालिकेच्या सभापती कार्यालयात आ.सीमा हिरे, नगरसेवक सलिम शेख, दिनकर पाटील,नगरसेविका दिक्षा लोंढे,अशा विविध पक्षाच्या नेत्यांनी मध्यस्थी करून जैस्वाल परिवाराला पाच लाख रुपयांची नुकसान भरपाई महापालिका ठेकेदाराकडून देण्यात आली. याबाबत नाशिक मिरर न्यूज पोर्टल वर सविस्तर बातमी प्रसिद्ध करून जयस्वाल कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी यासाठी पाठपुरावा केला होता. याबाबत माहिती अशी की दि.१७ डिसेंबरला सकाळी पावणे सात वाजेच्या दरम्यान मित्रासोबत जॉगिंगला गेलेली युवती रोशनी केदारनाथ जयस्वाल (वय २२ रा.कामगार नगर, )ही युवती ग्लेनमार्क कंपनी समोरील रस्त्यावर धावण्याचा सराव करीत असताना नादुरुस्त घंटागाडीला टोचन लावून उतारावर चाललेल्या नादुरुस्त घंटागाडीचा धक्का लागुन मागच्या चाकाखाली सापडून तिच्या डोक्याला जबरदस्त मार लागला होतो. तिला उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना तिचा मृत्यू झाला होता. या अपघातातून दुर्देवी घटना घडल्यामुळे पोलिस उपनिरिक्षक होण्याचे स्वप्न तिने बाळगले होते. तसेच घरातील ती कमावती असल्याने तिच्या जाण्यामुळे तिच्यावर अवलंबून असलेल्या चार बहिणी,आई व लॉकडाउन नंतर बंद पडलेल्या कंपनीच्या कामानंतर मिळेल ते काम करुन मोलमजुरी करुन वडील असल्याने परिवाराची आर्थिक परिस्थिती बेताची होती. ती परिवारात मोठी असल्याने आणि तिला भाऊ नसल्याने ती नोकरी करुन परिवाराला हातभार लावित असे. याप्रसंगी सभापती रविंद्र धिवरे, मनपाचे आधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.
