नाशिक मिरर :
कोरोना विषाणूचा फैलाव होऊ नये यासाठी सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक २६ व सिडको विभागातील प्रभाग क्रमांक २७ मध्ये सामाजिक कार्यकर्ते निवृत्ती इंगोले हे स्वखर्चातुन जंतुनाशक औषधाची फवारणी करत आहेत. गेल्या महिन्याभरापासून ही औषध फवारणी सुरू असून कोरोना महामारी पूर्णपणे नियंत्रणात येत नाही, तोपर्यंत ही फवारणी सुरूच राहणार असल्याचे सांगत इंगोले यांनी इतर राजकीय पदाधिकाऱ्यासमोर एक आदर्श उभा ठाकला आहे.
मार्च २०२० कोविड १९ पहिल्या लाटेत देखील प्रभागात मोफत भाजीपाला वाटप व अन्नदान केले होते. गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सर्वत्र कोरोना या महामारीने हाहाकार माजला आहे. दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढत असून मृत्यु दरही वाढत आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी शासन-प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र रुग्ण संख्येचा आलेख दिवसेंदिवस वाढतच आहे. हीच बाब हेरून सामाजिक कार्यकर्ते निवृत्ती इंगोले यांनी माझे कुटुंब माझी जबाबदारी याप्रमाणे माझा प्रभाग माझी जबाबदारी ही संकल्पना राबवत प्रभाग क्रमांक २६ व २७ मध्ये स्वखर्चातुन जंतुनाशक औषधाची फवारणी सुरु केली आहे.
गेल्या महिनाभरात चुंचाळे,रामकृष्णनगर, संजीवनगर, सुप्रभात वसाहत, विराट नगर,विराट संकुल, भोर टाऊनशीप, जाधव संकुल, पाटील पार्क, मेदगे नगर, म्हाडा वसाहत, आशीर्वाद नगर, केवल पार्क, अष्टविनायक नगर,
लिंकरोड परिसर, मळे परिसर यासह प्रभाग क्रमांक २७ मधील आंबेडकर नगर, दत्त नगर परिसर, दातीर नगर लं, पर्ल पार्क ह्या ठिकाणी औषधाची फवारणी केली आहे. निवृत्ती इंगोले व त्यांचा मुलगा इंजि. लोकेश इंगोले हे हे स्वतः प्रभागात उभे राहून औषध फवारणी करत आहे. यासाठी रामदास मेदगे, शंकर सोनवणे, शुभम इंगोले, साहेबराव मेदगे, खंडू गुळवे, अक्षय सोनवणे यांच्यासह मातोश्री मित्र मंडळाच्या सदस्यचे सहकार्य लाभत आहे.
माझा प्रभाग माझी जबाबदारीमाझे कुटुंब माझी जबाबदारी या संकल्पनेतुन तसेच समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून माझा प्रभाग माझी जबाबदारी ही संकल्पना उदयास आली. कोरोना विषाणूचा फैलाव होऊ नये यासाठी प्रभागात औषध फवारणी सुरू केली असून कोरोना पूर्णपणे नियंत्रण येईपर्यंत ही मोहीम सुरु राहणार आहे. नागरिकांना परिसरात फवारणी करायची असल्यास त्यांनी 9822952558 ह्या क्रमांकावर संपर्क साधावा.– निवृत्ती इंगोले, सामाजिक कार्यकर्ते
