शिवसेना उपमहानगरप्रमुख देवा जाधव यांनी केले होते, शिबिराचे आयोजन
नाशिक मिरर : शिवसेना सातपूर विभाग व नाशिक महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन श्रमिकनगर परिसरातील खंडेराव महाराज मंदिर मैदान येथे आयोजित करण्यात आले होते. दोन दिवसाच्या शिबिरात ५०० पेक्षा जास्त नागरिकांनी आपली आरोग्य तपासणी करून घेतली.
या शिबिरात ब्लड काउंट,किडनी फंक्शन ,सीजीओटी लिव्हर फंक्शन टेस्ट ,थायराईड टेस्ट ,व्हिटामीन बी १२ ,एचबी१ सी,ब्लड शुगर लेव्हल,ब्लड प्रेशर,पल्स, टेंम्प्रेचर,अॉक्सिजन सच्युरेशन, या सर्व तपासण्या विनामुल्य करण्यात आल्या. तसेच प्रत्येकाला मास्क,पेन व कुटुंबासह तपासणी करणार्यांना १ किलो तांदुळ देण्यात आला. शिबिराचे आयोजन शिवसेना उपमहानगरप्रमुख देवा जाधव यांनी केले होते.या शिबिरासाठी अतुल पवार, सुरज भालेराव, आकाश मोकळ, सेतु पाठक, सनी मिश्रा,अर्जुन मेंदुरकर, वैभव झा,सनि चव्हाण,अजय जाधव, अभिषेक पंडीत,सौरभ मिश्रा,आदींनी परिश्रम घेतले.

