कार्यक्रमाचे आयोजन डॉ. वृषाली सोनवणे व नरेश सोनवणे यांनी केले होते ; तब्बल १ हजार ५७३ मुलाना डोस
नाशिक मिरर :  नाशिक शहर परिसरात संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव लक्षात घेता लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी 0 ते 16 वर्ष वयोगटातील बालकासाठी विश्व क्लिनिक व शिवसेना सातपूर विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य दिनाच्या औचित्य साधून मोफत सुवर्णप्राशन शिबिर १५ ऑगस्ट  रोजी घेण्यात आले.कार्यक्रमाचे आयोजन डॉ. वृषाली सोनवणे व नरेश सोनवणे यांनी केले होते.
         यावेळी शिवसेना महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर, शिवसेना गटनेते विलास शिंदे यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात झाली. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.वृषाली सोनवणे यांनी केले. त्या वेळेस त्यांनी सुवर्ण प्रशानाचे होणारे फायदे  सांगताना हा उपक्रम मुलांची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्या साठी दर महिन्याच्या गुरुपुष्य मुहूर्तावर वर्षभर मुलांसाठी मोफत घेणार असल्याचे सांगितले.यावेळी उपस्थिताचे आभार नरेश सोनवणे यांनी मानले.सूत्रसंचालन विजय बुरुकुल यांनी केले.यावेळी तज्ञ डॉ. शीतल सुरकर, डॉ.मंजुषा व्यवहारे, डॉ.सुप्रिया चांडवडकर, डॉ.अनुपमा मराठे ह्या टीमने महत्वाची कामगिरी बजावली.
  कोरोनाची सर्व  नियम पाळून तब्बल १ हजार ५७३ मुलाना डोस दिले गेले.  या प्रसंगी कार्यक्रमास लोकेश गवळी,देवा जाधव,दिपक मौले, जी एस साळवे, अल्का गायकवाड, युवराज धात्रक, वैभव ढिकले, चेतन उगले, लखन कुमावत, अशोक पारखे, रवी देवरे ,म्हस्के सर, अरुण घुगे, स्वप्नील आव्हाड,मंगेश पवार, मयुर जुनरे, संदिप भोजने, बाळा आव्हाळे, पंकज गुजर, अविनाश सोनवणे,सत्यजीत झाम्बरे, पलाश,राहुल साळुंखे, बापु सावकार,  परिसरातील नागरिक उपस्थित होते.
Don`t copy text!