नाशिक मिरर :

इंजिनिअरींगचे शिक्षण घेणा-या सात विद्यार्थ्यांविरूध्द मित्राच्या मृत्युप्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत युवकाच्या आईने सातपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाच्या आदेशान्वये सातपूर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार ऋचा भारती (रा.खडकी जि. अकोला), नमित मिश्रा (रा.पवई मुंबई), दीपककुमार झा, ऋषभराज सिन्हा (रा. दोघे बिहार), लक्ष जस्वाल (रा. छत्तीसगड), मोनिका वळवी (रा. भवानीपाडा जि.नंदूरबार) व ऋषीकेश दराडे (रा. आडगाव) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयीतांची नावे आहेत. मयत मुलाची आई प्रमिला महानकर (रा. उमरी जि. अकोला) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, संदिप फाऊंडेशन कॉलेज मध्ये मयत मुलगा व ७ आरोपी हे इंजिनियरींगचे शिक्षण घेत होते. अंकित व संशयित आरोपी यामध्ये नेहमी भांडण होत होते. यातील ७ आरोपीयांनी संगनमत करून दि.१५ मार्च २०२० रोजी मयत अंकित यांस व्यसन करण्यास जबरदस्ती करून आरोपीनी कट रचुन जिवे ठार मारले. याबाबत अकस्मात मृत्यू ची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. सदर मृत अंकित च्या आई ने मुलाची हत्या झाली असून खुणाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.परंतु पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू ची नोंद करण्यात आली होती. संदिप फाऊंडेशन या संस्थेत शिक्षण संस्थेत इंजिनिअरींगचे शिक्षण घेणा-या अंकित दिनकर महानकर (२१ रा. साई गार्डन सोसा. गुलमोहर कॉलनी, सातपूर) या युवकाचा १५ मार्च २०२० रोजी मृत्यु झाला याप्रकरणी पोलीसांनी दाद न दिल्याने मृत अंकितची आई प्रमिला महानकर यांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्याचा खून केल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले होते.फिर्यादी यांनी दाद मागण्यांसाठी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, न्यायालयात नाशिक येथे अर्ज केला होतो. मा. कोर्टाने सीआरपीसी १५६ (३) प्रमाणे न्यायालयाच्या आदेशान्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Don`t copy text!