दीड महिन्या पूर्वी च झाला होता विवाह
सातपूर : नाशिक मिरर वेबटीम  सातपूर येथील श्रमिकनगर येथे रेणुका माता चौक येथे राहणाऱ्या एका विवाहित तरूणीने राहत्या घरात पंख्याच्या हूकाला साडीच्या साह्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना ४ डिसेंबर रोजी सायंकाळी उघडकीस आली आहे.कोमल गौरव सिंह वय (२०) असे आत्महत्या केलेल्या मयत विवाहित महिलेचे नाव आहे.दीड महिन्यापूर्वीच सदर तरुण विवाहितेचा विवाह गौरव रामसिंग यांच्या सोबत झाला होता.महिलांचा पती व शास्त्रे कामावर गेले असताना घरी एकटी असताना गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अजून समजू शकले नाही. परिसरातील चौथ्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी सातपूर पोलीस स्टेशनमध्ये आकस्मित मृत्युची नोंद केली आहे.अधिक तपास सातपूर पोलिस करीत आहे.

बातम्या

Don`t copy text!