१ डिसेंबर पासून सुरु असलेले उपोषण अखेर सुटले
नाशिक मिरर वेबटीम : निफाड प्रदीप कापसे
१ डिसेंबर पासून सुरू असलेले उपोषण शुक्रवारी ४ डिसेंबर रोजी सोडवण्यात आले. ४ दिवसांपासून सुरु असलेले रानवड सहकारी साखर कारखाना चे बाबत महाराष्ट्र राज्य व नाशिक जिल्ह्यातुन अनेकांचे लक्ष लागून राहिलेले साखळी उपोषण संपविण्यात आले.आमदार दिलीप बनकर ,जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर,तहसीलदार शरद घोरपडे,व निफाड पोलीस निरीक्षक सानप साहेब ह्यांच्या आश्वासना ने रानवड सहकारी साखर कारखाना लि,पूर्ववत सुरु करण्यासाठी सुरु असलेले उपोषण मागे घेण्यात आले.
अनेक वर्षे बंद असलेली कारखान्याची चाकं पूर्ववत सुरु करण्यासाठी व कामगार तसेच ऊस उत्पादक शेतकरी यांना न्याय मिळवून देण्यासाठी आज पर्यंत अनेक निवेदने, मोर्चे,आंदोलन व उपोषण झाले. त्याचाच एक अखेरचा साखळी उपोषणचा मार्ग निवडण्यात आला.प्रबळ इच्छाशक्ती असणारे कार्यकर्ते उपोषणास बसले होते.त्यांना अनेक शेतकरी व शेतकरी संघटनेचे नेते ह्यांचा पाठिंबा मिळाला,शेतकरी संघर्षचे नेते हंसराज घुले व संजय पाटोळे,ह्यांचे विशेष सहकार्य लाभले.उपोषणकर्त्यांची दखल घेत आमदार दिलीप काका बनकर,जि, परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर, तहसीलदार शरद घोरपडे , निफाड पोलीस निरीक्षक सानप साहेब,पंचायत समितीचे उप सभापती शेवाळे साहेब,भाजपा नेते शंकर वाघ,सामोरे गेले,उपोषण कर्ते नामदेव शिंदे,धोंडीराम गायखे,विकास गायखे व सचिन वाघ ह्यांना सरबत देऊन उपोषण मागे घेण्यास सांगितले. आमदार व अधीकारी यानीं लवकरच कारखाना सुरु करू ,अशी ग्वाही दिली,ह्यावेळी अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
