आमदार सीमाताई हिरे यांच्या आमदार निधीतुन प्रभाग क्रमांक 10 मधील विश्वास नगर व श्री स्वामी विवेकांनद नगर येथे बसविण्यात आलेल्या लहान मुलांच्या खेळणी कामाचा लोकार्पण सोहळा संपन्न
सातपूर : नाशिक मिरर वेेेबटीम सातपूर येथील विश्वास नगर मधील पवनपुत्र हनुमान मंदिराजवळ बसविण्यात आलेल्या उद्यानात बसविण्यात आलेल्या लहान मुलांची खेळणीचा लोकार्पण सोहळा आमदार सीमा हिरे, नगरसेविका इंदुमती नागरे, माधुरी बोलकर, सातपुर प्रभाग सभापती रविंद्र धिवरे , भाजपा शहर उपाध्यक्ष रामहरी संभेराव, मंडल अध्यक्ष अमोल इघे, महेश हिरे, गणेश बोलकर, राजेंद्र चिखले, गौरव बोडके, प्रकाश नागरे, शिवाजी शहाणे, चारुदत्त आहेर, भगवान काकड, रविंद्र जोशी, निलेश भंदुरे, उदय बोरसे, संदिप काळे, रवि भोर, संगीता शेळके, रवि पालवे यांच्या उपस्थित संपन्न झाला. यावेळी आमदार सीमा हिरे यांनी सांगितले की, मतदार संघात मोठ्या माणसांसाठी आपण सोयीसुविधा करतो परंतु बालगोपाळ या सुविधांपासुन वंचित राहु नये यासाठी मतदार संघातील ब-याचशा उद्यानात खेळणी नसल्याने मुलांना खेळण्याचा आनंद घेता येत नाही. तर या लहान बालगोपाळांसाठी देखिल आमदार निधीतुन रुपये ६५ लाख रुपयांची खेळणी मंजुर असुन जवळपास सर्वच प्रभागात एका उद्यानात याप्रमाणे खेळणी बसविण्यात येत आहे. त्याचप्रमाणे महिलांसाठी ग्रीन जीम, जॉगिंग ट्रॅक, तरुणांसाठी जिम्नॅशियम हॉल, सभामंडप, तसेच परिसरातील धोकादायक विद्युततारा भुमिगत करण्यात आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे मतदार संघातील प्रलंबित पेलिकन पार्कच्या जागेवर सुसज्ज अद्यावत सेंट्रल पार्कचे काम सुरु असुन, सातपुर येथे बसस्थानक तर सातपुर पोलीस स्टेशन साठी सुसज्ज् असे पोलीस ठाणे इमारत त्याचप्रमाणे सोमेश्वर व बालाजी देवस्थान येथे पर्यटन विकास अंतर्गत सुशोभिकरणाची महत्वपुर्ण कामे करण्यात आली आहे.तसेच विद्यार्थ्यांना चांगले अध्ययन करता यावे,करिता मतदारसंघातील ६ विभागात ६ अभ्यासिका तसेच स्लम वस्तीतील पिण्याच्या पाण्याच्या पाईप लाईन टाकणे, ड्रीनेजची व्यवस्था करणे, सातपुर येथे जलकुंभ बांधणे यासारखी कामे मागील काळात पूर्ण करण्यात आली असुन अजुनही काही कामे प्रगतीपथावर आहे. मतदार संघाच्या विकासासाठी कटीबध्द असुन विकास हाच अजेंडा असल्याने येत्या ५ वर्षात संपूर्ण मतदार संघाचा विकास केल्याशिवाय थांबणार नाही. याशिवाय मतदार संघातील नागरिकांनी जे जे प्रश्न समस्या मांडल्या त्या सोडविण्याचा तसेच शासनदरबारी न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न सुरु आहे.असे यावेळी आमदार सीमा हिरे यांनी सांगितले. यावेळी अनिल गडाख, चंद्रकांत पाटकर, मच्छिंद्र शिंदे, संदिप पाटील, हिरालाल साळुंखे व परिसरातील विविध नागरिकांच्या वतीने स्वामी विवेकांनद नगर येथील विविध समस्या सोडविण्यासाठी आमदार सीमाताई हिरे यांना निवेदन देण्यात आले.यावेळी परिसरातील नागरिक व बाल गोपाळ मोठ्या उपस्थित होते.
