धुळे : नाशिक मिरर वेबटीम
दारूच्या नशेत असलेल्या भावानेच आपल्या सख्या भावाचा दांडक्याने मारहाण करुन खून केल्याची घटना साक्री तालुक्यातील गुंजाळ गावात घडली आहे. यातील आरोपीने पलायन केले असुन त्याला अटक करण्यासाठी पिंपळनेर पोलिस ठाण्यातील पथक रवाना करण्यात आले आहे.गुंजाळ गावात रहाणारे विश्वास झिपरु अहीरे वय ५२ हे मदयाच्या नशेत बडबड करीत असल्याने त्यांचा भाउ वेडु झिपरु अहीरे याला राग आला.त्याने विश्वास याला शांत रहाण्यासाठी सांगीतले पण काही उपयोग झाला नाही. विश्वास हा आपल्यालाच शिवीगाळ करीत असल्याचा राग मनात ठेवुन त्याने लाकडी दांडक्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. यात गंभिर जखमी झाल्याने विश्वास याचा मृत्यू झाला. यानंतर वेडु अहीरे याने घटनास्थळावरुन पलायन केले. ही माहीती कळाल्याने उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप मैराळे , सहायक पोलिस निरीक्षक दिलीप खेडकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. पण आरोपीने पलायन केल्याने पिंपळनेर पोलिस ठाण्याच्या पथकाला रवाना करण्यात आले आहे. यासंदर्भात शेगीबाई अहीरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
