नाशिक मिरर :
गेल्या वर्षभरापासुन कोरोना काळात गोरगरीब जनतेच्या सातपूर परिसरातील कुठल्याही समस्या असतील तर तिथे तात्काळ आवाज उठवून त्या संबंधित प्रशासनाच्या लक्षात आणून देऊन त्या समस्येचे निराकरण करण्याचे काम महादेवनगर जनसेवक सामाजिक संस्था करत आहे.या संस्थेला आज एक वर्ष पूर्ण होत असल्याने संस्थेचा वर्धापन दिन आज भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत सातपूर च्या महादेवनगर येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते महादेवनगर जनसेवक समिती सामाजिक संस्थेच्या फलकाचे फित कापत उदघाटन करण्यात आले.तसेच कोरोना काळात कोविड योद्ध्ये म्हणून काम करणारे स्मशानभूमीतील कामगार,महावितरण विभागाचे विद्युत पुरवठा करणारे अधिकारी व कर्मचारी तसेच पत्रकार बांधवाचा संस्थेच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी मान्यवरांनी संस्थेचे भरभरुन कौतुक करीत आपले मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी मनसे ज्येष्ठ नगरसेवक सलीम शेख,सातपूर प्रभाग सभापती योगेश शेवरे,माजी सभापती रविंद्र धिवरे,वंचित बहुजन आघाडीचे दिपचंद दोंदे,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नाशिक पश्चिम विधानसभा अध्यक्ष नितिन निगळ,भाजपा मंडलाचे सातपूर शहर उपाध्यक्ष निलेश भंदुरे,मनसे शहर सरचिटणीस ज्ञानेश्वर बगडे,प्रहार पक्षाचे नाशिक जिल्हा संघटक दिलीप पाटिल,सामाजिक कार्यकर्ते अरुण काळे ,बंटी लभडे,सचिन सिन्हा,मिलिंद कांबळे,अरुण जाधव, पद्मराज काळे ,राहुल पटेकर, महादेव नगर जनसेवक समिती संस्थापक अध्यक्ष विजय अहिरे, तसेच भारत भालेराव संजय तायडेप्रवीण भवर , सुनिल गुंजाळ, दिपक पगारे, ज्ञानेश्वर आव्हाड, विकास जगताप,आमिन शेख, भगवान पवार ,जगदीश पगारे ,कृष्णा भालेराव,अंबादास कापसे, रीतेश कांबळे,अविनाश केदारे , अक्षय बेंडकुळे,कीशोर सोनोवने, शांताराम गुंजाळ, रोहीत बरप , राहुल जाधव,दिपक काकविपुरे, अमोल आरणे,दिपक भालेराव,आदी संघटनेचे सदस्य व नागरिक उपस्थित होते.यावेळी आलेल्या सर्व मान्यवरांचे महादेवनगर जनसेवक समिती सामाजिक संस्थेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.
