नुकसान भरपाई मिळवण्यासाठी नागरिकांचा रस्ता- रोको

नाशिक मिरर वेबटीम : सातपूर अंबडलिंक रोड वर बुधवार रात्री दुचाकी व टाटा ४०७ टेम्पो मध्ये झालेल्या अपघातात नाशिक मनपाचे कर्मचारी रोहित पवार यांचा ५ वर्षीय मुलगा प्रणय रोहित पवार हा बालक ठार झाला आहे.रोहित पवार व त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मनपा कर्मचारी रात्री साडे दहा वाजेच्या दरम्यान आपल्या दुचाकीवरून अंबड लिंक रोडने पाटील पार्क येथे जात असताना विरुद्ध बाजूने भरधाव येणाऱ्या टेम्पो ने जोरडार धडक दिली. यात मुलगा प्रणय पवार याचा मृत्यू झाला आहे. तर रोहित पवार व पत्नी गंभीर जखमी झाले आहे.या ठिकाणी काही दिवसांपासून पाईप लाईन टाकण्याचे काम सुरु असल्याने या ठिकाणी रस्त्या वळविण्यात आला आहे.एकरी रस्तावर दोन वे करण्यात आले आहेत.
मात्र या बाबतीत ठेकेदाराणे सूचना फलक न लावल्याने टेम्पो भरधाव वेगाने चालवत दुचाकी ला धडक दिल्याने हा अपघात घडला असल्याने नागरिकांनी सांगितले.नागरिकांनी संबंधित ठेकेदार वर गुन्हा दाखल करून संबंधित कुटुंबास नुकसान भरपाई देण्यासाठी अर्धा तास रस्ता रोको करण्यात आला.या मुळे गुरुवारी दुपारी पपया नर्सरी ते दत्त मंदिर रस्ता अर्धा तास बंद होता.यावेळी सहायक पोलिस आयुक्त अशोक नखाते, सातपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर मोरे, सा.पोलीस निरीक्षक हेमंत नागरे आदी उपस्थित होते.

बातम्या

Don`t copy text!