सातपूर : नाशिक मिरर वेबटीम नाशिक महानगरपालिका  शाळा क्र.२८  सातपूर कॉलनी येथील जिजामाता शाळेतील विद्यार्थिनी धनश्री मोराणकर हिचा नांदी फाउंडेशन आयोजित निबंध स्पर्धेत राष्ट्रीय पातळीवर प्रथम क्रमांक मिळवून यश मिळवले आहे .नांदी फाउंडेशन आयोजित विविध स्पर्धामध्ये मनपा शिक्षण विभाग शाळा क्र २८ च्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय पातळीवर निबंध लेखन, ऑडिओ रेकॉर्डिंग, चित्रकला अशा विविध स्पर्धा मध्ये राष्ट्रीय पातळीवर यश संपादन केले आहे.
निबंध लेखन – राष्ट्रीय पातळीवर प्रथम ( विषय : मला मोठेपणी काय व्हायचे) धनश्री मोराणकर ( ४ थी  अ)
उत्तेजणार्थ – दर्शना जगताप ( ५ वी अ), ऑडिओ रेकॉर्डिंग- अनुष्का जाधव( ५ वी अ),चित्रकला – प्रगती गायकवाड(८ वी अ), दिपश्री मोराणकर( ३ री अ),शाळेतील वरील यशस्वी विद्यार्थ्यांनीना शाळेच्या मुख्याद्यापिका छाया गोसावी, ऋतुजा गवाले, वैभव आहिरे , सोनजी गवळी,  सुरेश खांडबहाले, यशवंत जाधव यांचे हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. व अभिनंदन करण्यात आले . उज्ज्वला  महाले, पूजा निकम, भाग्यश्री चौरे, मंजुषा जाधव व शारदा सोनवणे , वर्गशिक्षक यांनी मार्गदर्शन केले .शाळेच्या यशाबद्दल प्रशासनाधिकारी सुनीता धनगर , केंद्रप्रमुख नितिन देशमुख व सर्व मुख्याद्यापक ,  शिक्षक वृंद यांनी अभिनंदन केले .

बातम्या

Don`t copy text!