नवी दिल्ली: केंद्रीय अर्थसंकल्प २०२१ लोकसभेत सादर करण्यास सुरूवात झाली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पाचे वाचन करताना सुरूवातीलाच महाराष्ट्रासाठी एक मोठी घोषणा केली आहे. राज्यातील मेट्रो प्रकल्पाला बळ देणारी ही बातमी आहे.अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नाशिक आणि नागपूर मेट्रोसाठी मोठी आर्थिक तरदूत जाहीर केली आहे. त्यांनी नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यासाठी ५ हजार ९७६ कोटी तर नाशिक मेट्रोसाठी २ हजार ०९२ कोटीची तरतूद जाहीर केली आहे.आरोग्य सेवा केंद्र आणि लॅब यांना एकमेकांशी जोडले जाणार आहे. देशातील प्रत्येक जिल्ह्यात अत्याधुनिक लॅब उभारन्ह्यात येईल, असे त्यांनी सांगितले. देशात सध्या दोन करोना प्रतिबंधात्मक लसीना मान्यता मिळाली आहे. लवकरच आणखी दोन करोना प्रतिबंधात्मक लशी तयार होतील, असे त्यांनी सांगितले.

बातम्या

Don`t copy text!