नाशिक मिरर वेबटीम :
नाशिक – पुणे महामार्गावर मोहदरी घाटात शनिवारी (दि.14) सायंकाळी 6.45 च्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत नर बिबट्या ठार झाला.मोहदरी घाटातील श्री गणेश मंदिर परिसरातील वळणावर ही घटना घडली. बिबट्या रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नात असताना भरधाव वाहनाने धडक दिल्याचे सांगितले जाते. अपघातानंतर वाहनचालक फरार झाला. पाच ते सहा वर्षे वयाच्या या बिबट्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती. वाहनधारकांनी मृत बिबट्याला उचलून रस्त्याच्या कडेला ठेवले. वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. मोहदरी-माळेगाव वनउद्यान परिसरात दाट झाडी असून जंगली श्वापदांचा नेहमीच वावर असतो. रस्ता ओलांडताना जंगली श्वापदांना जीव गमवावा लागल्याच्या घटना नेहमी घडत असतात.

 

बातम्या

Don`t copy text!