देवस्थान संस्थान सज्ज

नाशिक मिरर वेबटीम :
महाराष्ट्र राज्यातील सर्व धार्मिकस्थळे सोमवार, दि. १६ नोव्हेंबर, २०२० रोजी भाविकांच्या दर्शनासाठी खुली करणे बाबत मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांनी घोषणा केली आहे.आद्यस्वयंभु शक्तीपीठ श्री क्षेत्र सप्तशृंगगड येथिल श्री सप्तशृंगी माता मंदिर विश्वस्त संस्थेने यापूर्वी केंद्र शासनाने धार्मिक स्थळांना निर्धारित दिलेल्या कोविड-१९ संदर्भीय विविध मार्गदर्शक सूचना व मार्गदर्शक तत्वे विचारात घेता, नवरात्र उत्सव संबंधित केलेल्या नियोजना नुसार सर्व भाविकांसाठी श्री भगवती मंदिरात प्रवेश करतांना मास्कचा वापर करणे, बंधनकारक असणार असून, सोशियल डिस्टसंसचे पालन होणेकामी चिन्हांकित प्रकारात दर्शन मार्गावर आखणी केलेली आहे. यासह मंदिर मार्गावर विविध ठिकाणी थर्मल गन, ऑक्सिमिटर, सॅनिटायझर स्टँड व हात धुण्याच्या सुविधा उभारण्यात आलेल्या आहेत.
विश्वस्त संस्थेने यापूर्वी शासकीय व आरोग्य विभागाने निर्देशित केलेल्या कोविड-१९ संदर्भीय मार्गदर्शक तत्वे व सूचनेनुसार १ मार्च, २०२० रोजी उभारलेल्या कोरोना विषाणू संसर्ग – आरोग्य जनजागृती अभियान अंतर्गत केलेल्या विविध उपाययोजना व निर्धारित केलेल्या सेवा-सुविधा तसेच प्रक्रियेनुसार श्री भगवती दर्शन सुविधा ही दि. १६ नोव्हेंबर, २०२० पासून भाविकांसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे. एकाच वेळी होणारी गर्दी टाळत, आरोग्य संदर्भीय आवश्यक त्या सर्व खबरदारीसह कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधात्मक सूचनांचे योग्य प्रकारे पालन करत कोरोना विषाणूचा संसर्ग टाळणेकामी ठिकठिकाणी पाहिली पायरी पासुन मंदिराच्या गाभारा पर्यत 5 फुटाच्या अंतरावर भाविकाचे नियोजन केले असुन मंदिरात जास्त गर्दी होऊन नये. यासाठी ठिकठिकाणी देवी संस्थान चे कर्मचारी तैनात करण्यात येणार आहे व माॅस लावुन मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे .


प्रत्येक भाविकांने स्वयंपूर्तीने सहभागी होवून मंदिर व्यवस्थापन, स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा प्रशासन, केंद्र व राज्य शासनाला योग्य ते सहकार्य देवू करावे. मंदिर हे गेल्या आठ महिन्यापासून कोविडच्या पार्श्वभूमीवर वर बंद होते. पण शासनाने पाडवापासुन मंदिर चालु करण्याचा निर्णय घेतल्याने सर्व व्यापारी वर्गाच्या चेहरा वर आनंद झाल्याचा पाहाव्यास मिळत आहे. कारण मंदिर बंद असल्याने सर्व आर्थिक उलाढाल बंद होऊन उपासमारी वेळ काही व्यापारी सह ग्रामस्थ वर आली होती. पण मंदीर उघडणार असणार असल्याने सर्वञ आंनद व्यक्त केला जात आहे. भाविकांनी सहकार्य करावे असे आवाहन विश्वस्त संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे.

बातम्या

Don`t copy text!