मंदिर परिसरात व्यवसाय सुरू झाल्याने ; अन् रोजगार झाला सुरू
नाशिक मिरर वेबटीम :
राज्यातील सर्व धार्मिकस्थळे सोमवार आज पासून नोव्हेंबर भाविकांच्या दर्शनासाठी खुली करण्याची महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घोषणा केली.सदर आदेशानुसार गंगापूररोड वरील नाशिक मधील प्राचीन व धार्मिक पुराणकाळापासून महत्व असलेले ब भाविकांचे श्रद्धा स्थान सोमेश्वर महादेव मंदिर सोमवारी आज रोजी सकाळी आठ वाजता दुग्ध महाभिषेक करून सर्वसामान्य भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे.नाशिक महानगरपालिका प्रभाग क्र.८ चे नगरसेवक तथा शिवसेना गटनेते विलास शिंदे व श्री .सोमेश्वर महादेव संस्थान गंगापूर यांचे सर्व पदाधिकारी व विश्वस्त यांच्या हस्ते दुग्ध महाभिषेक व महाआरती करून खुले करण्यात आले आहे.

यावेळी अध्यक्ष अँड. बापूसाहेब गायकर,उपाध्यक्ष प्रमोद गोरे,सेक्रेटरी बाळासाहेब लांबे , खजिनदार गोकुळ पाटील, विश्वस्त राहुल बर्वे,अविनाश पाटील,ज्ञानेश्वर पाटील, मुरलीधर पाटील, दत्तू चव्हाण,हरिष शिंदे, अनिल पाटील, सुधाकर पेखळे, मयूर पाटील, दत्तू पाटील, श्रीकांत पाटील यावेळीं उपस्थित होते. गुरुजी प्रशांत झा यांच्या मंत्रोच्चार मध्ये दुग्धोअभिषेक करण्यात आला.यावेळी नाशिक चे डेप्युटी कमिशनर सी.डी. जाधव हे देखील उपस्थित होते.मंदिर खुले करण्यात आल्या नंतर भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.त्यांना सर्व नियमांचे पालन करून दर्शन घ्यावे असे आव्हान करण्यात आले.
शासनाने धार्मिक स्थळांना निर्धारित दिलेल्या कोविड-१९ संदर्भीय विविध मार्गदर्शक सूचना व मंदिरात प्रवेश करतांना मास्कचा वापर करणे बंधनकारक असणार असून, सोशियल डिस्टसंसचे पालन होणेकामी चिन्हांकित प्रकारात दर्शन मार्गावर आखणी करणे आवश्यक आहे. यासह मंदिर मार्गावर विविध ठिकाणी थर्मल गन, ऑक्सिमिटर, सॅनिटायझर स्टँड व हात धुण्याच्या सुविधा उभारण्यात आलेल्या आहेत.
संस्थान चे कर्मचारी तैनात करण्यात येणार असून, व माॅस लावुन मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे प्रत्येक भाविकांने स्वयंपूर्तीने सहभागी होवून मंदिर व्यवस्थापन सहकार्य करावे.

मंदिर सुरू झाले; बंद व्यवसाय झाले सुरू :-
मंदिर हे गेल्या आठ महिन्यापासून कोविडच्या पार्श्वभूमीवर वर बंद होते. पण शासनाने पाडवापासुन मंदिर चालु करण्याचा निर्णय घेतल्याने सर्व व्यापारी वर्गाच्या चेहरा वर आनंद झाल्याचा पाहाव्यास मिळत आहे. कारण मंदिर बंद असल्याने सर्व आर्थिक उलाढाल बंद होऊन उपासमारी वेळ काही व्यवसायिकावर आली होती. पण मंदीर उघडणार असणार असल्याने सर्वञ आंनद व्यक्त केला जात आहे.सोमेश्वर मंदिर खुले झाल्याने मंदिराच्या किनाऱ्या वरील बोट क्लब सुरू झाले आहे.त्यामुळे पर्यटकांची रेलचेल सुरू झाली आहे.यामुळे बोटकलब चालकांना पुन्हा रोजगार मिळाला आहे.तर मंदिर परिसरात हारफुल विक्रेते, नास्ता सेंटर, पेरू,काकडी विक्री करणारे, खेळणी व धार्मिक साहित्य विक्रते अशा हातावर पोट भरणारे सर्वांना रोजगार मिळाला आहे.

