लासलगाव –  नाशिक मिरर वेबटीम   परदेशातून आयात केलेला कांदा शहरांमध्ये वितरणास सुरुवात झाल्याचा परिणाम कांदा दरात दिसून येत आहे.  सलग दुसऱ्या दिवशी येथील मुख्य बाजार समितीत कांदा दरात ६०० रुपयांची घसरण झाली असून दोन दिवसात कांदा दर हे एक हजार नऊशे रुपयांनी घसरल्याने बळीराजा हतबल झाला आहे. आज बुधवारी लासलगाव बाजार समितीत उन्हाळ कांद्याला कमाल ४७११ रुपये, सरासरी ३४०० रुपये तर नवीन लाल कांद्याला कमाल ४२०१ रुपये तर सरासरी ३३०० भाव मिळाला. नव्या लाल कांद्याची आवक पुढील काळात वाढणार आहे. त्याचाही दरावर परिणाम होणार असल्याची धास्ती कांदा उत्पादकांमध्ये आहे.

बातम्या

Don`t copy text!