युके मेटल इंडस्ट्रीज क्रिकेट टूर्नामेंट २०२३ मध्ये रॉयल किंग विजयी ; लगान संघ उपविजेता
नाशिक मिरर :वृत्तसेवा सागर आनप
सातपूर व अंबड औद्योगिक वसाहती मधील युके ग्रुप ऑफ कंपनी च्या वतीने युके मेटल इंडस्ट्रीज क्रिकेट टूर्नामेंट २०२३ चे आयोजन मॉडेल सिएनसी(प्रीसिजन) विभागाच्या वतीने करण्यात आले होते.
सय्यद पिंपरी येथील नाशिक तालुका क्रिडा संकुल मैदान वर सदर मैंचस चे आयोजन शनिवार दि.३०डिसेंबर रोजी करण्यात आले होते. सुपर स्टार,लगान,रॉयल किंग एलेव्हन,द अव्हेजर अशा एकूण चार संघ सहभागी झाले होते. यामध्ये एकूण ७ सामने झाले.प्रत्येकी ६ ओव्हर्स मंच घेण्यात आली. अंतिम सामना लगान विरुद्ध रॉयल किंग एलेव्हन, असा झाला.यामध्ये रॉयल किंग एलेव्हन संघाने ६ ओव्हर्स मध्ये शानदार फलंदाजी करून ७३ रणांचे आव्हान लगान संघाला दिले होते. परंतु रॉयल किंग एलेव्हन च्या गोलंदाजानी लगान संघाला ५८ धावपर्यंत रोखून धरले व रॉयल किंग एलेव्हन संघ १४ रणांनी विजयी झाला.प्रमुख पाहुणे दीपक पाटील विभाग प्रमुख सिएनसी, सुनील मराठे उत्पादन व्यवस्थापक ,अशोक साळवे, एचआर यांच्या हस्ते विजयी संघ रॉयल किंग एलेव्हन कॅप्टन चांगदेव गायके , उपविजेता लगान संघ कॅप्टन महिपत जाधव ,तसेच बेस्ट बॉलर महीपत जाधव (लगान), बेस्ट बॅट्समन सागर मेदने (लगान), बेस्ट रणर अप लगान संघ, बेस्ट स्ट्राइक नितीन पाटील(रॉयल किंग एलेव्हन),बेस्ट फिल्डर भारत कोटमे (सुपर स्टार), मॅन ऑफ द मॅच नितीन पाटील (रॉयल किंग एलेव्हन) यांना ट्रॉफी देऊन व मेडल देऊन सन्मानित करण्यात आले.द अव्हेजरचे संजय श्रीसागर तर सुपर स्टार संघांचे ज्ञानेश्वर शिंदे कर्णधार होते. टूर्नामेंटचे व्यवस्थापन युके इंडस्ट्रीजचे निखिल ढिकले, सागर बुरके, राजू ढिकले, शरद मेदने यांनी केले होते. पंच म्हणून आदित्य मराठे,अपुर्व मराठे, धनंजय लोखंडे, यांनी काम बघितले.यावेळी विजेत्या संघाने फटाक्याची आताषबाजी करून आंदोत्सव साजरा केला.

