नाशिक मिरर : वृत्तसेवा 
दर्पणकार पत्रकार संघाच्या वतीने दि. ५ जानेवारी रोजी ६ जानेवारी पत्रकार दिन औचित्य साधून पत्रकार व वृत्तपत्र विक्रेते यांचा सत्कार समारंभ चे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ पत्रकार गोकुळ सोनवणे, साई रुद्र बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष शाम फर्नांडिस, राष्ट्रवादी काँग्रेस सातपूर विभाग अध्यक्ष प्रवीण नागरे, राजू अनमोला, सातपूर वृत्तपत्र संघ अध्यक्ष,अनिल गोसावी सचिव, उपस्थित होते.

आचार्य बाळशास्त्री जांभेकर व सरस्वती माता यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष आबासाहेब एरंडे यांनी ६ जानेवारी चे महत्व व दर्पणचे जन्मदाते बाळशास्त्री जांभेकर यांची माहिती सांगितली. व दर्पणकार पत्रकार संघाचे वाटचाल व वृत्तपत्र विक्रेत्याच्या समस्या मांडल्या. शाम फर्नांडिस यांनी पत्रकार व वृत्तपत्र विक्रेत्यांना शुभेच्छा दिल्या. प्रवीण नागरे यांनी दर्पणकार पत्रकार संघ आजपर्यंत ध्येय उद्दिष्टाप्रमाणे कामकाजात असून संघाचे कौतुक करून पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच पत्रकार गोकुळ सोनवणे यांनी सामाजिक क्षेत्रात पत्रकाराचे मोठे योगदान असते. अकार्यक्षम प्रशासन व राजकीय परिस्थितीला जागे करण्याचे काम वृत्तपत्राच्या माध्यमातून पत्रकार पत्रकारितेच्या आपल्या लेखणीतून करत असतात. किमान पत्रकार दिनानिमित्त या असंघटीत घटकाचा गौरव होणे गरजेचे आहे. असे मनोगत याप्रसंगी व्यक्त करत शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी प्रमुख अतिथींच्या हस्ते पत्रकार व वृत्तपत्र विक्रेत्यांचा गौरव करण्यात आला. तसेच कार्यक्रम यशस्वीतेसाठी सागर आनप सहसचिव, ज्ञानेश्वर आंधळे राज्य उपाध्यक्ष, रेखा पोखरकर राज्य महिला अध्यक्ष, आदीने प्रयत्न केले. यावेळी सातपूर मधील सर्वपत्रकार व वृत्तपत्र विक्रेते उपस्थित होते. पत्रकार व वृत्तपत्र विक्रेते 

बातम्या

Don`t copy text!