नाशिक मिरर वेबटीम :  नाशिक- त्र्यंबक रस्त्यावरील सकाळ सर्कल ते समृध्द चौकापर्यंत उड्डाणपुल बांधण्यात यावा असे आमदार सीमा हिरे यांनी नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त कैलास जाधव, महापौर, स्थायी समिती सभापती यांच्याकडे लेखी निवेदनाव्दारे मागणी केली आहे.याबाबत आमदार सीमा हिरे यांनी सांगितले की, नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रातील त्र्यंबकरोडवर मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. हा रस्ता तीर्थक्षेत्र त्र्यंबकेश्वरकडे जातो. तसेच सातपुर व अंबड एमआयडीसी ही मोठी औद्योगिक वसाहत असल्याने अवजड वाहतुक तसेच शहरी वाहतुक देखिल या मार्गावरुन मोठ्या प्रमाणात होत असते. सकाळ सर्कल ते पपया नर्सरी पर्यंत नेहमी सातत्याने अपघात होत असतात. तसेच या मार्गावर मोठी नागरी वस्ती असलेले सातपुर गाव देखिल असुन पुढे पपया नर्सरीवरुन अंबड लिंकरोड, अंबड औद्योगिक वसाहतीकडे जाणारा मार्ग व अशोकनगर सातपुर कॉलनी कडे जाणारा मार्ग आहे. तर सकाळ सर्कल पासुन खुटवडनगर व सातपुर एमआयडीसी मध्ये प्रवेश करण्याचा मार्ग आहे. या मार्गावर २४ तास वाहतुकीची वर्दळ असते. परिणामी औद्योगिक वसाहत व नागरी वसाहती कडे जाणा-या वाहनांचे प्रमाण जास्त असल्याने वाहतुकीची कोंडी तयार होते. तसेच त्र्यंबकेश्वरकडे जाणारे पर्यटक देखिल याच मार्गावरुन जात असतात नाशिक शहराला जोडणारा मुख्य रस्ता असल्याने या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी सकाळ सर्कल ते समृध्दनगर चौका पर्यंत उड्डाणपूल बांधल्यास नक्कीच वाहतुकीची कोंडी कमी होवून सुरळीत वाहतुक होवू शकेल.त्यादृष्टीने नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील सकाळ सर्कल ते समृध्दनगर चौकापर्यंत उड्डाणपुलाची निर्मिती होण्याकरिता महापालिकेच्या अंदाजपत्रकात निधीची तरतुद करुन सदरचा पुल तातडीने बांधण्यात यावा अशा आशयाचे निवेदन दि.१९ डिसेंबर रोजी आमदार सीमा हिरे यांनी मनपा आयुक्त आयुक्त, महापौर आणि स्थायी समितीच्या सभापतींना देवून निधीची मागणी केली आहे.आवश्यकता पडल्यास आमदार निधी व राज्यशासनाकडे उड्डाणपूला साठी निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी आ.हिरे यांनी सांगितले.

बातम्या

Don`t copy text!