आपत्कालीन परिस्थितीत सातपुरकरांची सुरक्षा ऐरणीवर- सलीम शेख
प्रभागात कामे होत नसल्याने प्रभाग सभेत नगरसेवक झाले आक्रमक
प्रभागातील समस्या बाबत सर्व नगरसेवक आयुक्तांना भेटणार
सातपूर : नाशिक मिरर वेबटीम गेल्या दोन वर्षांपासून सातपूर येथील अग्निशामक केंद्रात आग विझविण्यासाठी एकही बंब उपलब्धच नसून सातपुरकरांची सुरक्षा ऐरणीवर आली असल्याची बाब नगरसेवक सलीम शेख यांनी उघडकीस आणली आहे. दरम्यान, सातपूर विभागासाठी राखीव असलेल्या तीन बंबाची व्यवस्था तत्काळ करावी अशी मागणी यावेळी प्रभाग सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी केली आहे.प्रभागातिल नगरसेवकाचे मूलभूत आवश्यक कामे होत नाही, दुर्गंधी बाबत तक्रार करून नेहमीत प्रमाणे धूर फवारणी करण्याची मागणी केली.तसेच सातपूर भागातील अस्वच्छता मुळे डेंगू मलेरिया रुग्ण वाढत असताना धूर फवारणी होत नसल्याचा आरोप करत, ठेकेदार मनमानी करत असेल तर ठेकेदारच्या बिलाची आर्थिक नाकेबंदी करण्यात यावी, अशी मागणी शेेेख यानी केली. सातपूर विभागातील अधिकारी व कर्मचारी काम करत नसल्याने या बाबतीत आयुक्तांना भेटत सर्व नगरसेवक एकजूट होऊन तक्रार करणार आहे. लॉक डॉउन नंतर नूतन सभापती रवींद्र धीवरे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार दि .९ रोजी प्रभागसभेचे आयोजन केले होते. शिवसेना गटनेते विलास शिंदे यांनी रस्त्यावर भरणाऱ्या भाजी बाजार, अस्वच्छता व दिवाळी सणात रोगराई पसरु नये म्हणून प्रत्येक प्रभागात धूर फवारणी करण्याची मागणी नगरसेवक विलास शिंदे यांनी केली. नगरसेवक दिनकर पाटील यांनी सर्व खातेप्रमुखांना जबाबदारीने काम करावे, अशी सूचना करत दिवाळीपूर्वी सर्व प्रभागात स्वच्छता व समस्या सोडण्यात याव्याखातेप्रमुखांना जबाबदारीने वागण्याचे निर्देश दिलेत. तसेच गैरहजर असलेले खातेप्रमुख पुढच्या सभेत उपस्थित राहण्याची सूचना केली.लोकप्रतिनिधींनी सुचविलेली कामे तातडीने करावीत असाही सल्ला दिला. आगामी महासभा ऑनलाइन ऐवजी ऑफलाईन घेण्याची मागणी नगरसेवक सलीम शेख यांनी नगरसचिव राजू कुटे यांच्याकडे केली. परिसरात मोकाट जनावरे,मोकाट कुत्र्यांची संख्या वाढत असून त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नगरसेवक भागवत आरोटे यांनी केली.या वेळी नगरसेवक विलास शिंदे,भगवान आरोटे,मधुकर जाधव,योगेश शेवरे,नगरसेविका दीक्षा लोंढे, हर्षदा गायकर,माधुरी बोलकर, सीमा निगळ, अलका आहेर,हेमलता कांडेकर, वर्षा भालेराव,रेखा बेंडकुळी, सिकृत सदस्य विजय भंदुरे,दशरथ लोखंडे यांनी देखील सभागृहात समस्या मांडल्या. सभापती रवींद्र धीवरे यांनी नगरसेवकाच्या तक्रारी ची दखल घेत अधिकाऱ्यांनी त्वरित कामे करत समस्या सोडवण्यासाठी लक्ष द्यावे असे आदेश दिले.
