नाशिक मिरर वेबटीम : येथील मॉडर्न एज्युकेशन सोसायटी संचलित माध्यमिक विद्यालयात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती युवा दिन साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार गोकुळ सोनवणे,महापालिका शिक्षण मंडळाचे माजी सदस्य रामहरी संभेराव,नितीन कुलकर्णी उपस्थित होते.प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करुन ते ध्येय गाठण्याचा प्रयत्न करावा.तसेच माहिती तंत्रज्ञानाचा वापर योग्य पद्धतीने केल्यास उज्ज्वल भविष्याससाठी फायदेशीर ठरेल.असे प्रतिपादन जेेष्ठ पत्रकार गोकुळ सोनवणे यांनी केले.यावेळी रामहरी संभेराव यांनीही मनोगत व्यक्त केले.विद्यालयाचे मुख्याध्यापक अनिल माळी यांनी प्रास्तविक केले. सूत्रसंचालन प्रकाश केंगे यांनी केले.वंदना कुलकर्णी यांनी आभार मानले.यावेळी स्वाती पाटेकर,अनघा राजहंस,वर्षा कटारनवरे,सुभाष भामरे,सुरेखा बागुल आदींसह शिक्षक,पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

बातम्या

Don`t copy text!