नाशिक मिरर वेबटीम :  मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या नाशिक येथील जनता विद्यालय व ज्युनिअर कॉलेज सातपूरमध्ये थोर युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाबाई यांची जयंती साजरी करण्यात आली.
प्रतिमापूजन विद्यालयाचे प्राचार्य साहेबराव पाटील, विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका उषा कदम, संस्थेचे माजी शिक्षणाधिकारी व विदयालयाचे पर्यवेक्षक रमेश तासकर, प्रमोद कांगुणे श्रीम.एम.एम. कसबे या मान्यवरांच्या हस्ते पार पडले.अध्यक्षस्थानी प्राचार्य साहेबराव पाटील होते. त्यानंतर विद्यालयातील ज्येष्ठ उपशिक्षिका सुरेखा बोऱ्हाडे यांनी दोन्ही थोर व्यक्तींचा जन्म,बालपण व सामाजिक कार्य तसेच राष्ट्राभिमान व राष्ट्र गौरव उंचावण्यासाठी आजच्या पिढीला मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरणारे विचार आणि जीवन चरित्राचा आढावा या प्रसंगी आपल्या मनोगतातून थोडक्यात घेतला. कार्यक्रमास विद्यालयातील सांस्कृतिक मंडळातील सदस्य , कला ,क्रीडा, व माध्यमिक विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयश्री बस्ते यांनी केले व आभार गणपतराव पोटे यांनी मानले.

बातम्या

Don`t copy text!